Soft Idli Recipe : तांदळाची इडली खाल्लीच असेल पण कधी रवा अन् उडीद दाळीची सॉफ्ट इडली ट्राय केलीत? वाचा रेसिपी

तुम्ही कधी रवा आणि उडीद दाळीची इडली ट्राय केली आहे का? ही इडली अत्यंत सॉफ्ट आणि चवीला टेस्टी अशी आहे
Soft Idli Recipe
Soft Idli Recipe esakal
Updated on

Soft Idli Recipe : आपल्यापैकी प्रत्येक जणांच्या घरी कधीतरी सकाळच्या नाश्त्याला इडली ही असतेच. हा दाक्षिणात्य पदार्थ अनेकांचा आवडता आहे. मात्र तांदूळ आणि उडीद दाळीची इडली तुम्ही कायम खाल्लीच असेल मात्र तुम्ही कधी रवा आणि उडीद दाळीची इडली ट्राय केली आहे का? ही इडली अत्यंत सॉफ्ट आणि चवीला टेस्टी अशी आहे. तुम्ही एकदातरी नक्कीच ट्राय करायला हवी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पाव कप रवा

पाव कप उडीद डाळ

मिर्ची

चवीपुरते मीठ

मेथी

Soft Idli Recipe
Breakfast from Soya Chunks : सकाळी प्रोटीनयुक्त अन् चविष्ट असा हेल्दी नाश्ता ट्राय करायचाय? नोट करा ही रेसिपी

बनवण्याची पद्धत

  • सर्वात आधी एका बाउलमध्ये उडीद दाळ आणि मेथी टाका. तर दुसऱ्या बाउलमध्ये रवा टाका. आता उडीद दाळ आणि रवा दोन तासांसाठी भिजत घाला.

  • जेव्हा रवा आणि उडीद दाळ चांगल्या प्रकारे भिजेल तेव्हा त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करा. आता यात भिजलेली मेथी टाका आणि चांगल्या प्रकारे घोळून घ्या. (Food)

Soft Idli Recipe
Worst-Rated Street Foods : भारतात दही पुरी, पापडी चाट अन्... या पदार्थांना अत्यंत वाईट रेटिंग! वाचा पूर्ण यादी
  • आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. आता या बॅटर ७ तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठे त्यानंतर इडली प्लेट घ्या त्याला तेल लावून त्यात बॅटर टाका.

  • आता इडली कुकरमध्ये प्रमाणात पाणी टाका आणि ही प्लेट व्यवस्थित ठेवा. आता इडली कुकर ५-१० मिनिटपर्यंत झाकून ठेवा. (recipe)

  • १० मिनिटांनंतर इडली व्यवस्थित शिजली की नाही ते चेक करा. आता ही इडली चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.