Types Of Pickles
Types Of PicklesSakal

Recipe: लोणच्यांच्या काही खास रेसिपी

लवकरच पावसाचे आगमन होणार आणि पहिला पाऊस पडला की, घरोघरी लोणच्यांची लगबग सुरू होते. तुम्ही पुढील प्रकराचे लोणचे खाल्ले आहेत का? नसेल तर जाणून घ्या बनवण्याची खास पद्धत कोणती आहे.
Published on

Pickles Recipes: लवकरच पावसाचे आगमन होणार आणि पहिला पाऊस पडला की, घरोघरी लोणच्यांची लगबग सुरू होते. अनेक लोकांना ताटात लोणचे असल्याशिवाय जेवण पुर्ण होत नाही. लोणचे बनवणे ही सोपी गोष्ट नाही. लोणचे विविध पद्धतीने बनवता येतात.

१) बनारसी लोणचे

साहित्य:

४ चमचे मोहरी

मेथी आणि सोप प्रत्येकी २ चमचे

१ कप आवळे

अर्धा कप तेल

आवश्यकतेनुसार मीठ

४ चमचे काश्मिरी मिर्चीचे तिखट

२ चमचे हळद

कृती:

आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्या. ८ ते १० मिनिटे वाफवून घ्या. बीपासून आवळा वेगळा होईल इतपत वाफवणे आवश्यक आहे. आता आवळ्याला काठा-काठाने छिद्र करा. मंद आचेवर मोहरी, मेथी, सोप स्वतंत्र भाजून पावडर करा. तेल गरम करून थोडी मोहरी, २ चिमूट हिंग घाला. मोहरी, मेथी आणि सोपची पावडर टाकून परतून घ्या. आता आवळे टाकून २ मिनिटे मसाले आवळ्यात मुरतील इतपत हलवत रहा. नंतर तिखट,हळद आणि आवश्यकतेनुसार मीठ घाला. एकदा मिश्रण एकजीव करून गँस बंद करा. हे लोणचे लागलीच खाता येते. पण लोणचे मुरेल तितके अधिक छान लागते.

२) कारल्याचे लोणचे

साहित्य:

अर्धा किलो कारले

अर्धा कट तेल

मीठ

तिखट आणि काश्मिरी मिर्चीचे तिखट

सोप

कलौंजी

मेथी दाणे

ओवा

मोहरी प्रत्येकी १ चमचा

अर्धा चमचा हळद

कृती:

कारल्याचे सोल सोलरने काढा आणि गोल चकत्या कापा. चकत्यांवर मीठ लावून काचेच्या बरणीत बाजूला ठेवा. सोप, कलौंजी, मेथी दाणे मंद आचेवर वेगवेगळे भाजून पावडर करा. दुसऱ्या दिवशी काचेच्या बरणीतील पाणी काढून टाका आणि दुसरी स्वच्छ धुऊन पुसलेली बरणी घ्या. कारल्यावर वर दिलेले मसाले टाका. मिश्रण चांगले हलवून दोन दिवस तसेच राहू द्या. दोन दिवसांनी कडकडीत तापवून थंड केलेले तेल टाका. दोन-तीन दिवसात लोणचे तयार होते. हे लोणचे सूर्यप्रकाशात ठेवल्यास अजून छान लागते.

Types Of Pickles
Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

३) गाजराचे लोणचे

अर्धा कप गाजर उभ्या किंवा चौकोनी आकारात कापून घ्या. तेल गरम करून बारीक वाटलेले लसूण आणि अद्रक परतून घ्या. लसूण-अद्रक फार लाल न करता लागलीच गाजराचे काप घालून छान परतून घ्या. नंतर ४ चमचे काश्मिरी लाल मिर्चीचे पावडर, १ चमचा हळद, १/४ चमचा मेथी दाण्याची पावडर आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा. जरा मंद आचेवर मिश्रण हलवत रहा. शेवटी लिंबाचा रस घाला. 

४) लसणाचे लोणचे

साहित्य:

पाव किलो लसूण, २५ ग्रँम मीठ, १० ग्रँम लाल मिर्चीचे पावडर, १ छोटा चमचा हिंग, दीड चमचा भाजून बारीक केलेले मेथी दाणे, तीळाचे तेल, १ चमचा मोहरी, २ चमचे व्हिनेगरकृती ः लसणाच्या साल काढलेल्या पाकळ्या घ्या.एका पातेल्यात पाणी घ्या. यावर प्लेट ठेवून लसूण वाफवून घ्या. किंवा लसूण स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ कपड्याने पुसून उन्हात तासभर वाळू द्या. लसूण काचेच्या. बरणीत भरा. आता एका भांड्यात हळद,मीठ,मेथी दाण्याचे पावडर, व्हिनेगर एकत्र करा. तेल गरम करा. यामध्ये मोहरी, हिंग टाका. हे सर्व मिश्रण लसणावर टाकून चांगले हलवून घ्या. दोन-तीन दिवस सूर्यप्रकाशाय बरणी ठेवा. अध्येमध्ये लोणचे हलवत रहा.

५) कारले-मिरची लोणचे

साहित्य:

५०० ग्रॅम कोवळी कारली व लिंब

२५० ग्रॅम ‌हिरव्या मिर्ची व मोहरी दाळ

१२५ ग्रॅम मेथीदाळ

५०० ग्रॅम मीठ व तेल

२५ ग्रॅम हळद

अंदाजे हिंग

कृती

४ ते ५ लिंबांचा रस ‌काढून बाजूला ठेवा. उरलेली लिंब, कारली व मिरच्यांच्या फोडी करा. तेल तापल्यावर आधी हिंग टाका. नंतर मोहरी दाळ व इतर मसाले टाकून थोडे परता. आता लिंब, कारली व मिर्चीचे काप फोडणी घाला व शिजू द्या. लिंबाचा रस टाकून  १-२ उकळी येऊ द्या. मिश्रण गार झाल्यावर बरणीत भरा. दुस-या दिवशी खायला द्या. ६-७ दिवस हे लोणचे टिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.