Soya Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा क्रिस्पी सोया कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी

सोया आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करते. म्हणून आम्ही तुमच्यासाठी सोया कटलेटची रेसिपी घेऊन आलो आहोत.
Soy Cutlet
Soy Cutletsakal
Updated on

सोया कटलेट हा सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य पदार्थ आहे. प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी फूडने करायची असते. सोया आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करते. म्हणून आम्ही तुमच्यासाठी सोया कटलेटची रेसिपी घेऊन आलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही बटाटा कटलेट, व्हेज कटलेट, ब्रेड कटलेट खाल्ले असेल, पण जर तुम्ही सोया कटलेट खाल्ले नसेल तर तुम्ही ते नाश्ता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोया कटलेट बनवण्याची सोपी पद्धत.

सोया कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सोयाबीन पावडर

2 कप उकडलेले बटाटे

ब्रेडचे तुकडे - 1 कप

1 कप कांदा बारीक चिरलेला

3 चमचे आले-लसूण पेस्ट

हिरव्या मिरच्या - 2-3 चिरलेल्या

काळी मिरी पावडर - अर्धा टीस्पून

कोथिंबीर

1 टीस्पून हळद

2 टेबलस्पून तेल

मीठ – चवीनुसार

Soy Cutlet
Healthy Breakfast : पोह्यापासून बनवा पौष्टिक अन् चवदार नाश्ता, जाणून घ्या रेसिपी

सोया कटलेट कसे बनवायचे

सोया कटलेट बनवण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या, त्यात सोया घेऊन त्याची पावडर करा. बटाटे उकडवून  सोलून घ्या. ते मॅश करा. आता या भांड्यात कांदा आणि ब्रेडचे तुकडे टाका आणि चांगले मिसळा. आता त्यात आले, लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पावडर, हळद, कांदा, मीठ घालून मिक्स करा.

ते चांगले एकजीव झाल्यावर तळहातावर तेल लावा. आता थोडं मिश्रण घेऊन त्याला कटलेटचा आकार द्या. अशा प्रकारे कटलेट बनवा आणि प्लेटमध्ये ठेवा. कढईत तेल टाकून चांगले गरम करा. त्यात तीन-चार कटलेट टाकून तळून घ्या. चविष्ट आणि पौष्टिक सोया कटलेट तयार आहे. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम खाण्याचा आनंद घ्या.

Related Stories

No stories found.