Summer Hydrating Drink : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्यांपैकी एक असणारी समस्या म्हणजे डिहायड्रेशन होय. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की, डिहायड्रेशन होते.
ही डिहायड्रेशनची समस्या वेळीच नाही रोखली तर तुमच्या जावावर ही बेतू शकते. त्यामुळे, डिहायड्रेशन टाळण्यासाठी आहारासोबतच, भरपूर पाणी पिण्यावर ही अवश्य भर द्या. या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही काकडी आणि पुदिन्यापासून बनवले जाणारे ड्रिंक देखील पिऊ शकता.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे, काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यासोबतच पुदिना आपले शरीर थंड ठेवण्यास फायदेशीर आहे. त्यामुळे, काकडी आणि पुदिन्यापासून बनवलेले हायड्रेटिंग ड्रिंक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
काकडी आणि पुदिन्याचे हे हेल्दी हायड्रेटिंग ड्रिंक प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात, या हायड्रेटिंग ड्रिंकची सोपी रेसिपी.
काकडी १
पुदिन्याची पाने ४-५
काळे मीठ
आवश्यकतेनुसार मीठ
लिंबाचा रस
सर्वात आधी काकडीची साल काढून घ्या किंवा जर तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही तशीच काकडी घेऊ शकता.
परंतु, सालीसकट काकडी घेतल्याने अधिक फायद्याचे ठरते. कारण, काकडीच्या सालीमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, शक्यतो सालीसकट काकडी घ्या.
आता काकडीचे बारीक स्लाईस करून घ्या. त्यामध्ये, पुदिन्याची पाने बारीक चिरून घाला.
त्यानंतर, मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी आणि पुदिन्याच्या पानांची बारीक पेस्ट करून घ्या.
आता या मिश्रणात थोडेसे पाणी (आवश्यकतेनुसार) मिसळून त्याची छान पेस्ट करून घ्या.
आता चाळणीमधून काकडी-पुदिन्याचे मिश्रण गाळून घ्या.
एका ग्लासमध्ये काकडी आणि पुदिन्याचा रस काढून घेतल्यानंतर, त्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळा.
आता चमच्याच्या मदतीने हे मिश्रण चांगल्या प्रकारे छान मिक्स करून घ्या.
आता त्यावर पुदिन्याच्या पानांचा आणि काकडीच्या स्लाईसचा वापर करून तुमचा ग्लास सजवा. तुमचे काकडी-पुदिन्याचे हे हायड्रेटिंग ड्रिंक तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.