काही लोकांना शाकाहार करणे आवडते तर काहींना मांसाहार आवडतो. तर काही लोकं आवडीप्रमाणे दोन्ही पदार्थ खातात. पण एक मुलगी आहे ती फक्त नॉनव्हेज खाऊनच जगतेय. या मुलीने २२ वर्षात शाकाहारी पदार्थांना हात लावलेला नाही. इतकंच काय तिच्या मित्राने तिने शाकाहार करावा म्हणून पैशांची पैज लावली. पण तिने ही पैजही नाकारली.
ही मुलगी कोण?
गेली २२ वर्ष फक्त मांसाहार करणाऱ्या या मुलीचे नाव समर मोनरो (Summer Monro) आहे. ही मुलगी केंब्रिजला राहते. तिचे वय २५ वर्षे असून गेल्या २२ वर्षात तिने शाकाहारी पदार्थांना स्पर्श केलेला नाही. जेव्हा ती ३ वर्षांची होती तेव्हा तिला बटाटे खाण्याची सक्ती केली गेली. त्यानंतर तिने शाकाहाराला स्पर्श केलेला नाही. ती फक्त कुरकुरे आणि चिप्स खाऊ शकते. त्याव्यतिरिक्त चिकन खातानाही ते कुरकुरीत असले पाहिजे याकडे तिचे लक्ष असते. समर अवॉइडेंट रिस्ट्रिक्टेड फ़ूड इन्टेक डिसऑर्डर (ARFID) ने पिडीत असून तो फोबियाचा एक प्रकार आहे.
३ महिने खाल्ले नाही चिकन
समर सांगते, ती व्हिटॅमिन-मिनरल्स असे कोणतेही सप्लिमेंट वापरत नसूनही ती पूर्णपमे निरोगी आहे. तिने रक्ताच्या अनेक चाचण्याही केल्या पण काहीच त्रास झाला नाही. चिकन नगेट्स खाताना त्यात चिकनचा तुकडा सापडला. त्यानंतर तिने तीन महिने चिकन खाणे बंद केले. मात्र, इतर काही मांसाहारी पदार्थांमधून ती फक्त १०० कॅलरीज घेत होती.
खाल्ल्यामुळे बिघडते तब्येत
समर सांगते मी, शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे, पण जेवण न केल्यामुळे मला मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो. जेव्हा लोक माझ्यासमोर खातात तेव्हा मलाही खावेसे वाटते, पण मी तसे करू शकत नाही. मी एकदा फळं खाण्याचा प्रयत्न केला, पण मी आजारी पडले. समर तिच्या 26 वर्षीय जोडीदार डीन मॅकनाइटसोबत राहते. जिथे जेवणाची व्हरायटी कमी आहे अशा ठिकाणी ते जेवायला जातात.
रिस्ट्रिक्टेड फ़ूड इन्टेक डिसऑर्डर म्हणजे काय? (What is Restrictive Food Intake Disorder)
रिस्ट्रिक्टेड फ़ूड इन्टेक डिसऑर्डर हा एक खाण्याचा विकार असून यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारचे अन्न खाणे टाळते किंवा ते अन्न खाऊ शकत नाही. हा विकार संवेदनशीलता, चव, तापमान, अन्नाचा पोत, वास इत्यादींमुळे होतो. जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचे काही पदार्थ खाण्याचा प्रयत्न केला तर त्याला उलट्या, अंगदुखी, पोटदुखी इ. समस्या निर्माण होतात. काहीवेळा या विकारामुळे, भूक लागत नाही किंवा ती व्यक्ती अन्नाचा आनंद घेऊ शकत नाही. हा विकार असलेल्या लोकांचे वजन कमी होऊ शकते, वजन वाढू शकते आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे व्हिटॅमिन-मिनरल्सची कमतरता भासू शकते. जर एखाद्याला अशाप्रकारचा त्रास होत असेल तर त्याने डॉक्टरांशी बोलले पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.