Masala Tak : आयुर्वेदामध्ये ताकाची खूप स्तुती केलेली आहे. हा अमृतासमान पदार्थ आपल्या शरीरात असलेले कोणत्याही प्रकारचे अपचन, अरुचीचे विकार कमी करण्यास मदत करतो. कोणत्याही प्रकारचे उदररोग, अरुची, तोंडात तुरटपणा येणे - तोंड बेचव होणे या सगळ्यांत ताकाला वेगवेगळ्या प्रकारे शरीरात घेतल्याचा फायदा होताना दिसतो. उन्हाळ्याचा दिवसांत नेहमी ताजे दह्याचेच ताक घेतलेले अत्यंत उत्तम. ग्रीष्म ऋतूमध्ये दही पूर्णपणे वर्ज्य सांगितलेले असते, त्यामुळे ताकाला जर संस्कारीत करुन घेतले तर ते पचनाला जास्त मदत करते.
सामग्री :
२ वाटी लोणी काढलेले ताजे पातळ ताक
२ टी स्पून तूप
अर्धा टी स्पून जिरे
१/४ टी स्पून किसलेले आले
२-३ कढीपत्त्याची पाने
थोडे हिंग
चवीपुरते मीठ
बारिक चिरलेली कोथिंबीर (Recipe)
कृती
लोखंडी कढल्यामध्ये २ टी स्पून तूप गरम करावे त्यावर जिरे घालावे, जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग, किसलेले आले, कढीपत्त्याची पाने आणि आवडत असल्यास अगदी छोटासा हिरव्या मिरचीचा तुकडा घालावा. ही फोडणी लगेचच ताकावर घालावी, त्यामध्ये काळे मीठ घालून व्यवस्थित ढवळून त्यात कोथिंबीर टाकून प्यायला घ्यावे. हे असे तुपाची फोडणी देऊन केलेले ताक जवळ-जवळ सगळ्याच प्रकृतींना मानवते. असे ताक जेवणानंतरही घेतले तर चालते, पण कधीतरी बिल्कूलच भूक नसेल तर अशाप्रकारचे मसाला ताक जेवणाऐवजीपण घेतले तर चालते. (Food News)
उन्हाळ्यात मसाला ताक पिण्याची वेगळीच मजा असते. त्याबरोबरच याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. मसाला ताक पिऊन शरीर थंड राहाते. त्यामुळे उन्हाळ्यात मसाला ताक आवर्जून प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.