Sunday Special: उपवासाला बनवा 'या' स्पेशल रेसिपी

Sunday Special: टिफिनसाठी रेसिपी शोधताना कधीतरी उपवासाचे पदार्थ न्यावे लागतात. कधी कधी बदल म्हणूनही उपवासाचे पदार्थ खावेसे वाटतात.
Sunday Special:
Sunday Special:Sakal
Updated on

Sunday Special: टिफिनसाठी रेसिपी शोधताना कधीतरी उपवासाचे पदार्थ न्यावे लागतात. कधी कधी बदल म्हणूनही उपवासाचे पदार्थ खावेसे वाटतात. नेहमीच्या रेसिपींमध्ये जरा बदल करून या नव्या रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा टिफिन डब्बा चमचमीत करा.

उपवास खीर

दूध चांगले उकळायला ठेवा. दुधात खवा, अर्धी वाटीसाखर, सुकामेवा, चारोळी, वेलची पूड , साखर टाकून दूध घट्ट होवू द्या. गँस बंद करून किसलेला पनीर टाका आणि खीर थंडी करून सर्व्ह करा.

उपवास भेळ

बटाटे आणि शेंगदाणे उकडवून घ्यायचे. त्यावर मीठ टाका. हिरवी चटणी, खजूर चटणी, आमचूर, काळी मिरी टाकून भेळ एकजीव करा. नंतर फराळी चिवडा, डाळिंबाचे दाणे, अंगूर टाकून सर्व्ह करा.

Sunday Special:
Morning Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा, जाणून घ्या रेसिपी

सफरचंद रबडी 

साहित्य

क्रिम मिल्क

साखर

बदाम कापलेले

वेलची पावडर

सफरचंद

दूध

पाककृती

सफरचंदाचे साल काढा आणि किसून घ्यादूध आटवून घ्या (साधारण एक लीटरचे अर्धा लीटर होऊ द्या)दूध घट्ट झाल्यावर किसलेले सफरचंद आणि साखर मिक्स करा आणि उकळी येऊ द्या.त्यात वेलची पावडर आणि बदाम तुकडे घाला आणि पुन्हा मंद आचेवर उकळी येऊ द्या तुमची सफरचंद रबडी तयार. हवी असल्यास, गरम खाऊ शकता अथवा फ्रिजमध्ये ठेऊन नंतर खाऊ शकता

उपवास सँडविच

पावभर भगर पीठाला तीन चमचे साबुदाणा पीठ घ्यायचे. भगर भाजून न घेता थेट पीठ करायचे. पीठात पाणी घालून आदल्या रात्री आंबवण्यासाठी ठेवायचे. नसता ऐनवेळी पीठात थोडे दही किंवा खायचा सोडा घालायचा. काळी मिरी पावडर व मीठ घालून पँनकेक बनवून घ्यायचे. स्टफिंगसाठी उकडलेला बटाटा स्मँश करून घ्यायचा. त्यामध्ये काळी मिरी पावडर, हिरवी मिर्ची, आमचूर पावडर, खजूर चटणी,मीठ टाकून पँनकेकमध्ये भरायचे. पँनकेक कट करून त्यावर चीज किसून टाकायचा. तशीच सर्व्ह करा किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.