Sunday Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा मकई टॉप सूप, नोट करा रेसिपी

Corn Soop Recipe: सध्या परतीचा पाऊस सुरू असल्याने वातावरण गारवा आहे. तुम्हाला रविवारी नाश्त्यात सुप प्यावासा वाटत असेल तर घरीच चवदार मकई सुप तयार करू शकता.
Sunday Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा मकई टॉप सूप, नोट करा रेसिपी
Sakal
Updated on

सकाळ साप्ताहिक- रेखा नाबर

Corn Soup Recipe: सध्या परतीचा पाऊस सर्वत्र पडत आहे. यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. आज सुट्टी असल्याने कुटूंबातील सर्व सदस्य घरी असतात. तुम्ही सर्वांसाठी सकाळी नाश्त्यात मकई टॉप सुप तयार करू शकता. हा सुप चवदार असून आरोग्यदायी देखील आहे. घरातील सर्व सदस्य आवडीने आस्वाद घेतील. चला तर मग जाणून घेऊया मकई टॉप सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

मकई टॉप सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक गाजर

५ फरसबीच्या शेंगा

१ भोपळी मिरची

अर्धी वाटी मक्याच्या कणसाचे दाणे वाफवून

तूप

१ जिरे चमचा

हिंग

मीरपूड

सैंधव

Sunday Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा मकई टॉप सूप, नोट करा रेसिपी
Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

मकई टॉप सूप बनवण्याची कृती

मकई टॉप सूप बनवण्यासाठी सर्वात आधी मक्याचे दाणे वाफवून बाजूला ठेवावे.

नंतर भाज्या वाफवून मिक्सर मधून वाटून घ्याव्या.

तुपावर जिरे हिंगाची फोडणी करून त्यात भाज्यांचे मिश्रण ओतावे.

त्यात मीरपूड व सैंधव घालावे.

सूप बाऊलमध्ये घालून वर कणसाचे दाणे पेरून खायला द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.