Sunday Special Sweet Dish : संडे स्पेशल ट्राय करा बेळगाव स्टाईल कुंदा अन् तेही घरच्या घरी

कुंदा ही बेळगावची खूप प्रसिद्ध स्वीट डिश
Sunday Special Sweet Dish
Sunday Special Sweet Dish esakal
Updated on

Sunday Special Sweet Dish : रविवार आला की कोणता नवीन पदार्थ ट्राय करायचा हा प्रश्न प्रत्येकाला असतोच. त्यात एखादी दुसऱ्या ठिकाणची रेसिपी खायला मिळाली तर मग पर्वणीच होते. अशीच एक रेसिपी म्हणजे कुंदा; कुंदा ही बेळगावची खूप प्रसिद्ध स्वीट डिश आहे; मुळात बनवायला खूप सोपी आणि घरच्याच साहित्यांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे.

Sunday Special Sweet Dish
ही स्वीट डिश खातील मोठ्या चवीनं! घरच्या घरी ट्राय करा 'सफरचंद रबडी'

बघूया, कुंदची रेसिपी

साहित्य

साखर अर्धा वाटी

डिंक १ टेस्पून

रवा १ टेस्पून

तूप १ टेस्पून

दही १ टेस्पून

दूध १/२ लिटर

जायफळ, वेलची पावडर आवडीनुसार

Sunday Special Sweet Dish
Chicken Chettinad Recipe : अशा प्रकारे बनवा दक्षिण भारतातील ही प्रसिद्ध चिकन डिश

कृती :-

1. साखर कँरेमल करायला एका पॅनमधे घालून बारीक गँसवर ठेवा.

2. कँरेमल तयार होईपर्यंत तूपामधे डिंक परतवून घ्या. नंतर राहीलेल्या तूपामधे रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या.

3. त्यामधे तळलेला डिंक घाला, त्यातच कच्चे दूधही घाला. दूध उकळू द्या, उकळत असताना दही घाला. दूधाला हलवत रहा. दूध फाटेल.

Sunday Special Sweet Dish
Recipe : एकसारखे पनीर खाऊन कंटाळलात?, ढाबा स्टाईलची 'ही' सोपी डिश ट्राय करा..

4. शेवटी तयार झालेले कँरेमल उकळत्या दूधामधे घाला व व्यवस्थित ढवळा. ढवळून जवळपास अर्धा तास उकळत राहू द्या.

5. अर्ध्या तासाने घट्ट गोळा तयार होतो. जायफळ, वेलची घाला व एका खोल बाऊलमधे काढा. थंड होऊ द्या.

6. अगदी विकतच्या सारखा तांबूस रंगाचा मस्त कुंदा तयार. तयार कुंद्यावर चांदीचा वर्ख आवडत असेल तर लावा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.