हिवाळा म्हटलं की नेहमी हेल्दी अन् पौष्टीक असं खावंस वाटतं. अनेकजण हिवाळ्यात गरम गरम सूप पितात. लहान मुलांना तर सूप प्रचंड आवडते. आज आपण एक आगळं वेगळं सूप कसं बनवायचं या विषयी जाणून घेणार आहोत.
सूप हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण आपण व्हेजिटेबल नूडल सूप कसं बनवायचं, याची रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
साहित्य :
१ चमचा आले-लसूण बारीक चिरलेले
१ छोटा कांदा
१ छोटे गाजर
मुठभर घेवड्याच्या कोवळ्या शेंगा
५-६ बेबी कॉर्न
४-५ मशरूम
मूठभर पालकाची पाने
२ कांद्यांची पात (हे सारे बारीक चिरून)
१०० ग्राम पनीरचे तुकडे
सोया सॉस
चिली सॉस
तेल
कोबी-फ्लॉवर-घेवडा आदी घरात असतील त्या भाज्या
नूडल्स (शक्यतो राईस नूडल्स)
कृती :
थोड्या तेलावर बारीक चिरलेले आले-लसूण आणि कांदा परता.
त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा थोडे परता.
त्यात दोन पेले व्हेजिटेबल स्टॉक घाला.
सूप उकळत आल्यावर त्यात अर्धा चमचा पांढऱ्या तिळाची पेस्ट, थोडा सोया सॉस आणि थोडा चिली सॉस घाला.
वरुन चिरलेले पनीर, कांद्याची पात आणि नूडल्स घाला.
एक उकळी काढा.
सूप अधिक तिखट हवे असल्यास शेजवान सॉसही घालू शकता. थंडीच्या दिवसांत गरमागरम सूपची चवच न्यारी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.