Teacher's Day Celebration: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शाळांमध्ये या दिवसाबाबत मुलांमध्ये मोठी उत्सुकता असते. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतात. त्यांना खास वाटावे म्हणून ते भेटवस्तू देतात.
शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांना खास वाटण्यासाठी केक बनवू शकता. हा केक बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया एग्लेस स्पंज केक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते.
मैदा- एक कप
पिठीसाखर - एक कप
बेकिंग पावडर- एक टीस्पून
बेकिंग सोडा- अर्धा चमचा
पांढरा व्हिनेगर - एक चमचे
तेल - दोन चमचे
दूध - एक कप
व्हॅनिला इसेन्स - एक टीस्पून
एका भांड्यात मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करा.
नंतर एका वेगळ्या भांड्यात दूध घ्या आणि त्यात व्हिनेगर घाला. ते मिसळा आणि दहा मिनिटे विश्रांतीसाठी सोडा. अशा प्रकारे बटर मिल्क तयार होईल.
नंतर बटर मिल्कमध्ये पिठीसाखर टाका, चांगले मिसळा आणि नंतर बेकिंग सोडा घाला. त्यात बुडबुडे दिसू लागेपर्यंत पाच ते सात मिनिटे राहू द्या. आता त्यात व्हॅनिला इसेन्स टाका. आता त्यात पीठ घालून चांगले एकजीव करा.
हे सर्व मिश्रण आपल्या केक पॅनमध्ये काढून ओव्हनमध्ये 170 डिग्री गॅसवर सेट करा आणि 40 मिनिटे बेक करू द्या. 40 मिनिटांनी आणि थंड झाल्यावर बाहेर काढा. तुमचा स्पंजी केक तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.