Teacher's Day 2024: मुलांच्या डब्यासाठी बनवा चवदार पोहा-बटाटा टिक्की, शिक्षकदिन बनेल खास

Aloo Poha Tikki recipe: दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवसाला खास बनवण्यासाठी मुलांच्या डब्यात पोहा-बटाटा टिक्की देऊ शकता.
poha aloo recipe
poha aloo recipeSakal
Updated on

Aloo Poha Tikki recipe: दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात आणि त्यांचे आभार मानतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही मुलांच्या डब्यात पोहा-बटाटा टिक्की बनवून देऊ शकता. ही टिक्की बनवणे खुप सोपे असून चवदार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही टीक्की बनवू शकता.

बटाटा-पोहे टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पोहे

कोथिंबीर

तीळ

कोळे मीरं

जीरं

कस्तुरी मेथी

लाल तिखट

हळद

मीठ

गरम मसाला

उकडलेला बटाटा

बारिक चिरलेला कांदा

तेल

poha aloo recipe
Teachers Day 2024: शिक्षक दिन स्पेशल, 'या' सोप्या पद्धतींनी सजवा ग्रिटींग कार्ड, शिक्षकांचा दिवस बनेल खास

बटाटा-पोहे टिक्की बनवण्याची कृती

बटाटा पोहा टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवावे.

नंतर पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावे.

नंतर त्यातील पाणी काढून पोहे एका भांड्यात काढावे.

नंतर त्यात कोथिंबीर, तीळ, कोळे मीरं, जीरं, कस्तुरी मेथी, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, उकडलेला बटाटा किसून टाकावा.

नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा टाका आणि चांगले मिक्स करावे.

नंतर हाताला तेल लावून गोलाकारात छोट्या टिक्की बनवा.

नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावे आणि त्यात डिप फ्राय करून घ्यावे.

तुम्ही सकाळी नाश्त्यात आणि मुलांना डब्यात चवदार पदार्थ बनवून देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.