Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!

Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!
Updated on

मानवी इतिहासात साधारण पंधराव्या शतकात दैनंदिनीत ‘नाश्ता’ या गोष्टीचा समावेश झाला. आपला प्राचीन इतिहास बघता भारतात न्याहरीची सुरूवात त्याआधीच झालेली असावी. पाककला-आहारशास्त्र या गोष्टीत बदल होत गेले तसे नाश्त्यातले पदार्थही बदलत गेले.आता ओट्स-काॅर्नफ्लेक्स या रेडीफूडचा जमाना आहे. आज यातल्या काॅर्नफ्लेक्सची गोष्ट सांगतो.

गोष्ट आहे १८९४ सालची..

अमेरिकेमधील मिशिगनच्या बॅटल क्रीक सॅनेटोरियम रुग्णालयात डाॅ.जाॅन हार्वे केलाॅग हे मुख्य व्यवस्थापक होते. त्यांचा विल किथ नावाचा धाकटा भाऊ रुग्णांच्या व्यवस्थेत त्यांची मदत करायचा. रुग्णांची जेवणाची जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यावर घेतली होती. डाॅ.जाॅन हार्वे केलॉग भाऊ म्हणून प्रेमळ असले तरी व्यवस्थापनाच्या बाबतीत अंमळ शिस्तप्रिय होते.

Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!
बहरलेल्या फळबागांचा धोरणकर्ता

भाऊ असला तरी बंधुप्रेम घरी रुग्णालयात मात्र ते रोज धाकट्या भावाच्या कामात चुका काढत-सुचना करत ‘देअर इज अल्वेज अ चान्स ऑफ बेटरमेंट ॲंड इम्प्रुव्हमेंट’ हा त्यांचा खाक्याच होता.

“चांगलं जेवण देत जा रे” कुणाचीही तक्रार नसतांना ते रोज सर्वांसमक्ष भावाला समज देत.

आपल्याकडं असं झालं असतं तर डाॅक्टरपेक्षा त्याच्या भावाचाच रुबाब चालला असता पण ही माणसं व्यवसायमुल्य जाणून होती. धाकटा भाऊही बिचारा रोज काय बदल-सुधारणा करता येईल यावर चिंतन करायचा. त्यानं जेवणात नेहमीच्या मांसाहारी पदार्थांना फाटा देत गहू-ज्वारी-तांदूळ-जव-मका अश्या शाकाहारी पदार्थांचा समावेश करायला सुरूवात केली. बदल तर होताच पण हा आहार अधिक फायबरयुक्त आणि जीवनसत्व-खनिजयुक्त होता अन् सोबत पचवायलाही सुलभ होता.

रुग्णांसोबतच त्यांच्या बदलेल्या शारिरीक परिस्थितीनं आणि जलद रिकव्हरीनं यावर शिक्कामोर्तबही झालं. तेव्हापासून मिशिगन रुग्णालयात रुग्णांसाठी उकळत्या दुधात थोडी साखर आणि किंचित मसाला टाकून वेगवेगळी धान्ये दिली जाऊ लागली.

Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!
Relationship Advice : एक्सनं लग्नाला बोलावलं तर जायचं की नाही?

८ ऑगस्ट १८९४ या दिवशी त्यांनी दुधात पहिल्यांदाच गहू उकळला. पेशंटनं ते चाखूनच व्याऽऽक केलं..नेमका विल त्या दिवशी कामानिमित्तानं बाहेरगावी गेला होता. परतल्यानंतर त्यानं हे सगळं ऐकलं आणि कुणालाही काही न बोलता आधी स्वत: एक चमच ते अन्न चाखलं.

गव्हाचे दाणे अर्धवटच शिजले होते..

यानंतरही विल कुणावर डाफरला नाही ना त्यानं अन्न फेकलं त्यानं स्वत: तव्यावर भाजलं मग ते सुकवलं आणि ते मिक्सरमध्ये दळून ते रोलरमध्ये टाकलं आता पीठ मिळेल म्हणून वाट बघतो तर काय? रोलरमधून छोटे छोटे चिप्ससदृश्य तुकडे बाहेर पडले..

दुसरं कुणी असतं तर ‘छ्याऽऽ हे काय?’ म्हटला असता पण विलनं ते पुन्हा गोड दुधात उकळवलं आणि एका रुग्णाला देऊन बघितलं. ते चाखून रुग्ण आनंदानं वेडा झाला अन् त्याचा आदल्या दिवसाचा रागही गेला. बाकीच्यांनी पण हा पदार्थ चाखला, सगळ्यांनी वाहवा तर केलीच पण उद्याही ‘हेच दे’ अशी फर्माइशही केली.

स्वयंपाकघरातले गहू संपले होते विलनं हीच पद्धत वापरून दुसरे धान्य वापरले यातले मक्याचे चिप्स रुग्णांना भयंकर आवडले.

Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!
दुध, अंडी एकत्र घेताय? केस गळतीसह 'या' अडचणींचा करावा लागेल सामना

या बंधुद्वयीनं ३१मे १८९५ या दिवशी ‘केलाॅग्ज’ या त्यांच्या नावानेच या पदार्थासाठी पेटंटचा अर्ज केला आणि १४एप्रिल १८९६ चा दिवशी त्यांचं पेटंट मंजूर झालं. १९ फेब्रुवारी १९०६ या दिवशी केलाॅग्ज बंधू व्यवसायात उतरले आणि रुग्णांव्यतिरिक्त सगळ्यांसाठीच त्यांनी हा पौष्टिक नाश्ता बनवायची सुरूवात केली. आज हा उद्योग जगभर पसरलाय जवळपास १८० देशात या कंपनीचे विविध ब्रॅंड्स बनवले आणि विकले जातात पण, लोकांची पहिली पसंत आजही केलाॅग्ज काॅर्नफ्लेक्स हीच आहे.

ढोबळपणे ही गोष्ट तुम्हाला एक यशस्वी उद्योगगाथा वाटेल पण ही केवळ उद्योगगाथा नाही ही शिक्षणाने डाॅक्टर असलेल्या-आपल्या भावाला व्यवसायमुल्य शिकवणाऱ्या सोबतच आरोग्य कार्यकर्ता-आहारतज्ज्ञ-पोषणतज्ज्ञ-उद्योजक आणि सर्वात महत्वाचं मानवी मुल्य मानणाऱ्या संशोधकांची गोष्ट आहे..

डाॅ.जाॅन हार्वे केलाॅग यांच्या स्मृतीदिनी सहज हा प्रपंच आणि या बंधुद्वयीला सलाम !!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.