जेवताना जास्त डाळ खात असाल तर शरीरावर होतील पाच परिणाम

मेडिसिननेटच्या बातमीनुसार, जास्त प्रमाणात डाळी, कडधान्ये खाल्ल्याने शरीराला अपाय होतात
Lentils effects on body
Lentils effects on body
Updated on

Lentils side effects: रोजच्या जेवणात आपण सगळेच डाळींचा समावेश करतो. आमटी-भात खाणे (Food) अनेकांना आवडते. काहीजण कडधान्यही खातात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते डाळी खाल्ल्याने त्यातून तुम्हाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळते. त्यामुळे शरीरातील एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊन हृदयविकाराचा धोका (Heart Problem) कमी होतो. डाळी शरीराच्या (Body) आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत. पण आरोग्याला चांगल्या म्हणून त्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास त्याचा तोटाही होऊ शकतो. मेडिसिननेटच्या बातमीनुसार, जास्त प्रमाणात डाळी, कडधान्ये खाल्ल्याने शरीराला अपाय होतात. ते कोणते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Lentils effects on body
व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास १४ पट वाढतो कोरोनाचा धोका, अभ्यासात स्पष्ट

काय येतात समस्या

1) जास्त डाळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जेवणात जास्त प्रमाणात डाळ खाल्ली तर अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. बऱ्याच लोकांना डाळींमुळे एसिडीटी होते.

2) जास्त प्रमाणात डाळ खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होण्यात अडचणी निर्माण होतात. जास्त डाळी खाल्ल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. त्यामुळे अधिक नुकसान होऊ शकते. तसेच किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

3) डाळीत अधिक प्रमाणात प्रोटीन असते. जर तुम्ही डाएटमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर तुमचे वजन वेगाने वाढेल. शरीराचे वजन वाढले की अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

4) जास्त डाळ खाल्ल्याने अपचन, डिहायड्रेशन, थकवा, मळमळ, चिडचिड होणे, डोकेदुखी आणि जुलाब यांसारख्या आतड्यांसंबंधी समस्या निर्माण होतात.

5) डाळींमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला संधिरोगाचा त्रास होत असेल तर त्याने डाळी खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lentils effects on body
नवा फिटनेस ट्रेंड Plogging कसा आहे? त्याचे आरोग्य, पर्यावरणाला होतात पाच फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()