ओळखा पनीर अस्सल की बनावटी, या आहेत टिप्स

ओळखा पनीर अस्सल की बनावटी, या आहेत टिप्स
Updated on
Summary

पनीर तसे आरोग्यदायी आहे. मात्र ते बनावट (भेसळयुक्त) असेल तर फायदा होण्याऐवजी शरीराला हानी होऊ शकते.

एखादाच असेल ज्याला खायला पनीर आवडत नसेल. घरात विशेष सेलिब्रेशन असेल तर कोणत्याही भाजीत पनीर खायला आवडते. ते आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. त्यात मोठ्या प्रमाणावर लोह, कॅल्शियम आणि मॅग्निशियम असते. त्यातून शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळतात. ते शरीरात गुड कॅलेस्ट्रोलचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. त्याने तुमचे हृदयही चांगले राहते. पनीर तसे आरोग्यदायी आहे. मात्र ते बनावट (भेसळयुक्त) असेल तर फायदा होण्याऐवजी शरीराला हानी होऊ शकते. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बनावट पनीर कसे ओळखावे याविषयी काही टीप्स देणार आहोत. तर चला जाणून घेऊ या...

हाताने मळून तपासा

तुम्ही बाजारात केव्हा ही पनीर खरेदीला जाल तेव्हा प्रथम ते हाताने मळून तपासा. बनावटी पनीर स्किम्ड मिल्क पावडरपासून बनवलेले असते. त्यामुळे ते हाताचा दबाव सहन करु शकत नाही. मळल्याने पनीरचे तुकडे होऊन ते विखूरते. जर तुम्ही पनीर हातांनी मळल्याने तुटून विखरत असेल तर समजावे की ते बनावटी आहे. अशा पनीरचे सेवन केल्याने शरीराची पचन यंत्रणा बिघडते.

आयोडिन टिंचरने ओळखा बनावटी पनीर

बनावटी पनीर ओळखण्यासाठी तुम्ही आयोडीन टिंचरचा वापर करु शकता. सर्वप्रथम बाजारातून आणलेले पनीर एका पॅनमध्ये घ्या आणि त्यात पाणी टाका. आता ते पाच मिनिटांपर्यंत उकळून थंड करा. थंड झाल्यानंतर या पनीरमध्ये आयोडीन टिंचरची काही थेंब टाका. पाहा की पनीरचा रंग तर निळा होत नाही ना. जर ते निळे झाले तर समजा की तुमचे पनीर बनावटी आहे.

नरम असतो अस्सल पनीर

तुम्ही जेव्हाही बाजारातून पनीर आणाल तर तो रबरासारखा नसावा. बनावटी पनीर हे रबराप्रमाणे असते. अस्सल पनीर नरम असते.

सोयाबीन किंवा तूर डाळाच्या पीठाने तपासा

पनीर अस्सल कि बनावट ओळखण्यासाठी पाण्यात टाकून थोडा वेळ उकडा. थोडे थंड झाल्याने त्यात सोयाबीन किंवा तूर डाळाचे पीठ टाकून १० मिनिटांसाठी ठेवा. जर १० मिनिटानंतर या पनीरचा रंग फिकट लाल होत असेल तर समजा की तुमचे पनीर बनावटी आहे. लाल रंग होण्याचा अर्थ असा की बनावटी पनीर डिटर्जंट किंवा युरियाने बनवले गेले आहे. हे दोन घटक आपल्यासाठी खूपच धोकादायक आहे. सगळ्यांनी बनावट पनीर खाण्यापासून दूर राहिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()