Lunch Recipe : घरी वांग्याची भाजी केली तर मुलं आणि मोठ्यांचीही तोंडं बघण्यासारखी असतात, आणि भाजी खायला कुणी तयार होत नाही. मात्र घरच्यांनी हिच भाजी आवडीने खावी असं तुम्हाला वाटत असेल तर मग ही नवी रेसिपी ट्राय करून बघा. दुपारच्या जेवणासाठी पूर्णपणे नवीन पद्धतीने वांग्याची करी बनवा. ही भाजी खाऊन नक्कीच तुमच्या घरचे सदस्य ती पुन्हा पुन्हा खाण्याचा हट्ट करतील. चला तर मग जाणून घेऊया वांग्याची भाजी अगदी नवीन पद्धतीने कशी करायची ते.
२-३ मध्यम आकाराची वांगी
बटाटे ५-६ लहान आकाराचे
3-4 लहान टोमॅटो
जिरे
हळद
मेथीचे दाणे
काश्मिरी लाल मिरची
मीठ
मेथी
हिंग
कांदा कापलेला
3 चमचे मोहरी तेल
५-६ लसूण पाकळ्या (Recipe)
सर्वप्रथम वांग्याची साल सोलून घ्या. आता ते लांब कापून घ्या. टोमॅटो देखील चिरून घ्या. बटाटे सोलून स्वच्छ धुवा. या सर्व भाज्या व लसूण कुकरमध्ये टाका आणि पाणी घालून शिट्टी होतपर्यंत असू द्या. दोन ते तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. कढईत मोहरीचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर जिरे तडतडून घ्या. सोबत हिंग घाला. बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत चांगले परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात हळद, काश्मिरी लाल मिरची, मिरची आणि आल्याची पेस्ट घालून परतून घ्या. (food)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.