आज आपण त्या भज्यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत जे पावसाळ्याची मजा दुप्पट करतात. खास पावसाळ्यात 'हे’ ६ प्रकारचे भजी खा जे चटपटीत असण्यासोबतच पचनक्रियाही सुरुळीत करतात.
पावसाळा (monsoon) म्हटलं की, गरमगरम भजे आलेच. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितले किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गरमा गरम भजी आणि वाफाळलेला चहा (tea with pakora) यासारखं स्वर्गसुख देणारं दुसरं कोणतं समीकरण असूच शकत नाही. (try these tasty bhaji in rainy season it will help you for digestion)
कांदा भजी व बटाटा भजी हे प्रकार तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण भज्यांमध्येही असे काही प्रकार आढळतात जे बनवायला सोपे आणि अतिशय चविष्ट असतात. शिवाय या भज्यांमुळे आरोग्यालाही फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला त्या प्रकारच्या ६ भज्यांची माहिती देणार आहोत जे तुमचा हा पावसाळा अविस्मरणीय बनवू शकतात
1) पालक भजी
मन तृप्त करणा-या पदार्थांपैकी एक असतात पालकचे भजी. एकदम बारीक चिरलेल्या पालक आणि त्यात हिरव्या मिरची घालुन तयार केले जाणारे चटपटीत पालकचे भजी दुपारच्या जेवणात किंवा स्नॅक्समध्ये खाल्ल गेले तर दिवस भारी जातो. हिरवी मिरची आणि पालक दोन्हीही घटक शरीरासाठी अत्यंत पोषक व लाभदायक असतात. पालक शरीरातील रक्त शुद्धीकरणास व हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
2) कांदा भजी
कांदा भजी माहित नाही किंवा खाल्ले नाहीत असा माणूस शोधून कुठे सापडणार नाही. ब-याच जणांचे कांदा भजी आवडते असतात कारण ते झटपट बनतात व कमी वेळात जिभेचे चोचले पुरवणारा एक उत्तम पर्याय मानले जातात. ऋतू कोणताही असो हिवाळा, पावसाळा किंवा मग उन्हाळा, निवांत क्षण अजून सुंदर बनवण्यासाठी कांदा भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. कांदा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. तसंच कांदा भजी पचनक्रिया सुरूळीत बनवून सर्दी-पडसं, ताप अशा आजारांना शरीरापासून दूर ठेवतात.
3) मुगाच्या डाळीचे भजी
मुगाची डाळ आरोग्यदायी व पचायला सोपी असते. मुगांची दाळ काही तास भिजवून ठेवुन नंतर त्याची वाटून बारीक पेस्ट केली जाते. या पेस्टमध्ये मीठ, लाल तिखट, मसाले,तिळ मिसळून त्याचे भजी बनवले जातात. रोज रोजचा नाश्ता खाऊन किंवा गोड खाऊन खाऊन कंटाळला असाल तर मुग डाळीचे पौष्टिक भजी हा एक मस्त पर्याय ठरु शकतो. हे सर्व भजी हिरवी चटणी, सॉस किंवा चहासोबत खाल्ले जाऊ शकतात.
4) अळूच्या पानांचे भजी
अळूच्या पानांचे भजी बनवण्याची पाककृती जरा इतर प्रकारच्या भज्यांच्या तुलनेत वेगळी असते. बाकी सर्व प्रकारातील भजी बनवण्यासाठी त्या भाजीचे पाने बेसनमध्ये घोळवून तेलात तळली जातात. पण अळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी बेसन पिठात मीठ, तेल, लाल तिखट मसाला मिसळून ते पानांच्या मध्ये घातलं जातं. पानांची सुरळी करुन त्याला वरुन धागा बांधला जातो आणि ते तेलात तळले जातात.
5) मेथीच्या भाजीचे भजे
हिरवी मेथी किंवा मेथीच्या पानांचा सुंगध सर्वांनाच आपल्याकडे आकर्षिक करतो. बेसनच्या पीठात घोळून तळलेले मेथीचे भजी आणि गरमा गरम वाफाळलेला चहा थंडीत काही औरच मजा देऊन जातो. मेथी मध्ये उष्ण गुणधर्म दडलेले असतात जे हिवाळ्यात थंड पडणा-या शरीराला ऊब प्रदान करतात व आतून उष्ण ठेवतात. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही या मेथी भज्यांचा आस्वाद नक्की घेऊ शक
6) फुलकोबीचे भजे
फुलकोबीचे भजी देखील पावसाळ्यात अगदी चवदार लागतात .फुलकोबी पचनास अतिशय हलकी असते. फ्लावरचे भजी चवीस आणि आरोग्याय दोन्हीसाठी उत्तम असतात.
फुलकोबी भजीसाठी लागणारे साहित्य - 200 ग्राम फुलकोबीचे तुकडे, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1/2 टेबलस्पून लाल तिखट, 1/2 टेबलस्पून मीठ, 1/2 टीस्पून ओवा, चिमटभर खायचा सोडा, 1/2 वाटी बेसन पीठ, कोथिंबीर, तळणीसाठी तेल
कृती - फुलकोबीचे लहान लहान तुकडे सर्वप्रथम हळद मीठाच्या गरम पाण्यात भिजवून ठेवावेत. एका पॅनमध्ये आल लसूण पेस्ट घ्यावी. बेसन पिठ,लाल तिखट, मीठ, ओवा घालून घ्यावा.आता पाणी घालून गुठळ्या होणार नाही असे हलवून पिठ भिजवून घ्यावे. नंतर फुलकोबीचे तुकडे आणखी एकदा धूवून घ्यावेत आणि पिठात घालावेत. तेल गरम करून त्यात भजी सोडावेत. गरमा गरम तयार पकोडे साॅस व चहासोबत सर्व्ह करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.