Walnut Halawa Recipe: अक्रोडमधील पोषक द्रव्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यात ओमेगा-३ फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं.
मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड Walnut फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे निरोगी हृदयासाठी Healthy Heart आणि हाडं मजबूत होण्यासाठी देखील अक्रोड फायदेशीर आहे. Try Walnut Halawa for Healthy Heart and Memory Boost
यासाठीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा संपूर्ण कुटुंबियासाठी अक्रोडचा Walnut टेस्टी हलवा स्वीड डिश म्हणून बनवू शकता. हा हलवा Halawa तुम्ही कोणत्याही मौसमात आणि वातावरणात खावू शकता. अगदी लहान मुलांपासून घरातील मोठ्याना देखील हा हलवा नक्कीच आवडेल.
अक्रोडचा हा टेस्टी आणि हेल्दी हलवा तयार करण्याती सोपी रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
अक्रोड हलव्यासाठी लागणारी सामग्री
अक्रोड १ कप, दूध १ कप, वेलची पावडर अर्धा टी स्पून, केसर ३-४ काड्या, साखर अर्धा वाटी किंवा चवीनुसार, तूप अर्धी वाटी, मिल्क पावडर, गार्निशिंगसाठी काजू आणि बदामचे काप
अक्रोडच्या हलव्याची रेसिपी
हलवा तयार करण्यासाठी २ कप गरम पाण्यामध्ये अक्रोडाचा गर टाकून अर्धा तासांसाठी भिजत ठेवा.
भिजलेले अक्रोड पाण्यातून काढून मिक्सरमध्ये त्याची भरड पेस्ट तयार करा.
त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात २-३ चमचे तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात भरडलेले अक्रोड टाकून मंद आचेवर परता.
३-४ मिनिटं अक्रोड परतल्यानंतर त्यात मिल्क पावडर टाकून पुन्हा १ मिनिटं परता.
त्यानंतर त्यात अर्धा वाटी साखर टाका.
त्यानंतर एक वाटी कोमट दूधामध्ये केशराच्या काड्या टाका.
हे दूध हलव्यामध्ये टाका आणि ढवळत रहा.
दूध पूर्णपणे आटेपर्यंत हलवा ढवळत रहा. हळूहळू हलव्याला पुन्हा तूप सुटू लागेल.
त्यानंतर त्यात वेलची पूड टाका.
गॅस बंद करून त्यावर बारीक केलेल बदाम आणि काजू टाका.
अशा प्रकारे एकदम हेल्दी आणि टेस्टी असा अक्रोडचा हलवा तुमचा मूड चांगला करण्यासोबत तुमच्या आरोग्य चांगल राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.
हे देखिल वाचा-
अक्रोड खाण्याचे फायदे Benefits of Walnut
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असल्याने चयापचय क्रिया जलद होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
अक्रोडमुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो. अक्रोडमध्ये मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, फॉलेट, लोह ,व्हिटॅमिन बी 6, आणि थियामीन अशी पोषक तत्व आढळतात. या पोषक तत्वांमुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यासोबतच तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.