Food Tips : या ६ भाज्या व फळे खा, काँस्टीपेशन-डिहायड्रेशन घालवा

शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहाड्रेशन होते, जर मुबलक प्रमाणात पाणी पिऊ शकत नसाल तर काही फळे व भाज्यांचा जेवणात समावेश करावा.
Food Tips
Food Tipsesakal
Updated on

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक असते. कारण पाण्याच्या कमीने त्वचेच्या समस्या, डोके दुखी, स्नायूंमध्ये क्रॅम्प येतो. लोकांना वाटते की पाणी पिणे हे हायड्रेट राहण्याचा उत्तम मार्ग आहे. पण हा एकमेव मार्ग नाही. काही अशा भाज्या व फळे आहेत ज्यात भरपूर पाणी असते ज्यामुळे शरीरातील पाण्याच्या कमतरते बरोबर इतर पोषण तत्वेदेखिल मिळतात.

फळे व भाज्यांचा सर्वात मोठा फायदा हा असतो की, पाण्याबरोबरच फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम व प्रोटीन सारखे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. आपण ही फळे, भाज्या सॅलेड किंवा स्मूदीच्या माध्यमातून ग्रहण करू शकतो.

Food Tips
Calcium rich food: आपल्या पुर्ण 206 हाडांना लागणारे पुरेसे कॅल्शियम देतील 'या' सहा गोष्टी

चला तर जाणून घेऊया कोणत्या फळांत व भाज्यांत पाण्यांचे प्रमाण अधिक असते.

संत्री

डायेट अँड फिटनेसच्या एका रिपोर्टनुसार संत्र्यात ८८ टक्के पाणी असते. यासह फायबर, पोटॅशियम, व्हीटॅमिन सी, रोगांशी लढणाऱ्या अँटीबॉडीज असे पोषक तत्वे असतात.

आंबे

आंब्यात ८३ टक्के पाणी असते. यात पोटॅशियम, व्हीटॅमिन ए, बीटा कॅरेटीन व व्हीटॅमिन सी यांचा भांडार आहे.

Food Tips
Sayali Sanjeev : सायली संजीवने सांगितला फिटनेस फंडा

अननस

या फळात पाण्याचेप्रमाण ८६ टक्के असून यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हीटॅमीन सी, ए व फोलेट ही पोषण तत्वे असतात.

पेर

या फळात ८८ टक्के पाणी असते. तर पोटॅशियमचे प्रमाण यात सर्वाधिक असते. याशिवाय व्हीटॅमिन ए, बीटा कॅरेटीन व फॉस्फरस याचे हे फळ उत्तम स्रोत आहे.

Food Tips
ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

घोसाळे / गिलके

या भाजीत पाण्याचे प्रमाण ९४ टक्के असते. हा व्हीटॅमिन सीचा उत्तम स्रोत असून याच्या एक कप रसात ३५ टक्के आवश्कता पूर्ण करण्याची क्षमता असते.

काकडी

काकडीत पाण्याचे प्रमाण ९५ टक्के असून त्यात व्हीटॅमिन के, पोटॅशियम व मॅग्नेशियम पोषण तत्वे मिळतात. तसेच व्हीटॅमिन ए चाही उत्तम स्रोत आहे.

Food Tips
Ranbhaji: करटोलीची भाजी कशी करतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()