Vitamin D Recipe : उन्हात न बसताही 'हा' पुलाव खाऊन पूर्ण करा व्हिटॅमिन डी ची कमतरता

बहुतेक लोकांना बटतं की, हेल्दी फूड टेस्टी नसतात. पण आज अशी डिश सांगणार आहोत जी जेवढी हेल्दी आहे तेवढीच टेस्टीपण आहे.
Vitamin D Recipe
Vitamin D Recipe esakal
Updated on

Vitamin D Rich Food Recipe : व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरासाठी आणि हाडांसाठी फार आवश्यक असतं. जर हाडं मजबूत ठेवायची असतील तर आहार व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ असणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात.

बहुतेक लोकांना बटतं की, हेल्दी फूड टेस्टी नसतात. पण आज अशी डिश सांगणार आहोत जी जेवढी हेल्दी आहे तेवढीच टेस्टीपण आहे. मशरूम व्हिटॅमिन डी चा बेस्ट सोर्स आहे. त्यामुळे आज आपण मशरूम पासून टेस्टी पुलावची रेसिपी बघुया.

साहित्य

लांब तांदुळ १ कप, मशरूम २०० ग्रॅम, तेल, कांदा १, टोमॅटो १, बटाटा १, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आले, लसूण, लवंग, वेलची, तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी.

कृती

  • तांदूळ नीट धुवून भीजत घाला.

  • बारीक चिरून घ्या.

  • कुकरमध्ये तेल गरम करून जीरे, तमालपत्र, दालचिनीचा तडका द्या

  • यात आले, लसूण, कांद्याची पेस्ट टाका. थोड्यावेळ परता.

  • हिरवी मिरची, टोमॅटो, बटाटा आणि मशरूमचे तुकडे घाला.

  • भाज्या ४-५ मिनीटं शिजू द्या

  • पाणी काढून तांदूळ टाकून भाज्यांसोबत १ मिनीट नीट परता.

  • कुकरमध्ये मीठ आणि २ कप पाणी टाकून झाकण लावून शिजवा.

  • २-३ शिट्ट्या घेऊन गॅस बंद करा.

  • कुकर गार झाल्यावर उघडून भात छान वर खाली हलवून घ्या आणि वरून कोथिंबीर, पुदिना घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.