स्वयंपाकघरातील हळदीचे आयुर्वेदिक गुणकारी उपयोग

आयुर्वेदातही हळदीचे अगणित फायदे दिलेले आहेत. असंख्य औषधांमध्ये हळद वापरलेली असते.
स्वयंपाकघरातील हळदीचे आयुर्वेदिक गुणकारी उपयोग
esakal
Updated on

रोजच्या वापरातील कितीतरी गोष्टी अशा असतात, ज्यांचा आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो आयुर्वेदातही एका ठिकाणी म्हटलेले आहे, आहारासारखे उत्तम असे दुसरे कोणतेच औषध नाही. केवळ योग्य अन्नाच्या मदतीनेच अनेक रोग बरे करणे व निरामय राहणे शक्य आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात मसाल्याचा डबा असतोच. या मसाल्याच्या डब्यात असतेच असते ती म्हणजे हळद. स्वयंपाकघरच नव्हे, तर देवघरात, प्रथमोपचाराच्या पेटीतही हळदींची उपस्थिती असतेच. आयुर्वेदातही हळदीचे अगणित फायदे दिलेले आहेत. असंख्य औषधांमध्ये हळद वापरलेली असते. आज आपण या हळदीचा औषध म्हणून कसा उपयोग करता येईल याची माहिती घेऊ या.

हळदीचे झाड कर्दळीच्या झाडासारखे असते, हिच्या पानांनासुद्धा हळदीसारखा सुगंध असतो. हळकुंड म्हणजे जमिनीखाली वाढणारा कंद असतो. सहसा बाजारात मिळणारी हळद हळकुंड शिजवून तयार केलेली असते. मात्र अशी हळद औषध म्हणून प्रशस्त समजली जात नाही. तेव्हा चांगल्या प्रतीची ओली हळकुंडे विकत आणून ती उन्हात वाळवली जातात. पूर्णपणे वाळली की सुती कापडात बांधून जमिनीत खड्डा खणून त्यात किंवा धान्याच्या मोठ्या साठ्यात (पिंप, ड्रम वगैरे) १०-१२ दिवसांसाठी पुरून ठेवली जातात. बाहेर काढल्यानंतर पुन्हा उन्हात वाळवून चूर्ण केले जाते व औषध म्हणून वापरले जाते. काळपट रंगाची हळद अधिक गुणकारी असते.

हळद चवीने तिखट व कडू असते, गुणाने रुक्ष तर वीर्याने उष्ण असते. कफदोष तसेच पित्तदोष कमी करते, वर्ण उजळवण्यास उत्तम असते, त्वचेवरील दोष, प्रमेह, रक्तदोष, सूज, पांडू (निस्तेज त्वचा), जखमा वगैरे त्रासांवर उपयोगी असते.

हळद चवीने तिखट व कडू असते, गुणाने रुक्ष तर वीर्याने उष्ण असते. कफदोष तसेच पित्तदोष कमी करते, वर्ण उजळवण्यास उत्तम असते, त्वचेवरील दोष, प्रमेह, रक्तदोष, सूज, पांडू (निस्तेज त्वचा), जखमा वगैरे त्रासांवर उपयोगी असते.

स्वयंपाकघरातील हळदीचे आयुर्वेदिक गुणकारी उपयोग
सोन्याचा वडापाव कधी खाल्लायं? 2021मध्ये व्हायरल झाल्या गोल्ड प्लेटेड डिश

हळदीचे औषधी उपयोग

  • हळदीमुळे अन्नाला रुची तर येतेच, पण हळद ही आमदोष पचवण्यासाठी मदत करणारी असते. शौचावाटे आव पडण्याची किंवा सहजासहजी जुलाब होण्याची

  • जिभेला चव नसेल, तोंडाला वास येत असेल, तोंडात चिकटा जाणवत असेल तेव्हा हळकुंडाच्या काढ्याने गंडुष करण्याचा म्हणजे काढा तयार झाला की तोंडात चूळ घरून ठेवल्याप्रमाणे दहा मिनिटांसाठी घरून ठेवण्याचा उपयोग होतो.

  • खोकला होऊन कफ पडत असेल अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी हळकुंडाचा छोटा तुकड़ा भाजून घेऊन चावून खाणे चांगले असते.

  • प्रवृत्ती असणाऱ्यांनी हळदीचा आहारात समावेश करणे चांगले असते.

  • जंतांवरही हळद हे एक साधे पण प्रभावी औषध आहे. महिनाभर रोज सकाळी अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा वावडिंग हे मिश्रण मधाबरोबर घेतले व त्यानंतर एका दिवशी गंधर्वहरीतकी किंवा एरंडेल घेऊन जुलाब करवला तर जंत पडून जाण्यास मदत मिळते.

  • कुठेही जखम झाली की त्यावर हळदीचे चूर्ण दाबून धरले की रक्तस्त्राव तर थांबतोच पण जंतुसंसर्ग न होता जखम सहजपणे भरून येण्यास मदत मिळते..

  • डोळे येतात त्यावर हळदीच्या काढ्याने डोळे धुणे प्रशस्त असते. यामुळे डोळ्यांची

  • आग, लालसरपणा, सूज तसेच डोळ्यातून येणारा स्राव कमी होतो.

  • शरीरावर कुठेही मुका मार लागला किंवा एखादा शरीरभाग मुरगाळला व त्या ठिकाणी सूज आली तर हळकुंड व आंबेहळद उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावण्याने लगेच बरे वाटते.

स्वयंपाकघरातील हळदीचे आयुर्वेदिक गुणकारी उपयोग
2021 मध्ये समोसा, बिर्याणीवर सर्वाधिक ताव, स्विगीकडे भरपूर ऑर्डर
  • चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, पुटकुळ्या, पुरळ, काळे डाग येत असल्यास हळकुंड व चंदन उगाळून लेप करण्याचा उपयोग होतो. लेप लावल्यावर तो पूर्ण सुकण्यापूर्वीच काढून टाकणे चांगले.

  • भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या आधी नवरदेव-नवरीच्या अंगाला हळद लावण्याची पद्धत आहे. यामागे हळदीमुळे त्वचा शुद्ध व्हावी, उजळावी हाही एक मोठा उद्देश असतो. म्हणूनच एरवीसुद्धा स्नानाच्या वेळी साबणाऐवजी हळद, मसुराचे पीठ व दुधावरची साय किंवा दही हे मिश्रण अंगाला लावणे उत्तम असते. यामुळे अति प्रमाणात घाम येणेसुद्धा कमी होते. चेहऱ्याची त्वचा सैल पडली असेल, रखरखीत होत असेल तर हळद व लोणी एकत्र करून लावून ठेवण्याचा उपयोग होतो.

  • रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्यास अतिरिक्त चरबीचे प्रमाण घटण्यास मदत मिळते.

  • त्वचारोगांमुळे असह्य कंड सुटते तेव्हा हळकुंड खोबरेल तेलात उगाळून त्यांच्या लेप करण्याने बरे वाटते.

  • हळद बाळंतिणीसाठी उत्तम असते. गर्भाशय पूर्ववत व्हावे, गर्भाशयाची ताकद वाढावी, जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी बाळंतिणीच्या आहारात हळदीचा समावेश असावा.

  • हळद स्तन्यशुद्धीसाठी उत्तम असते. म्हणून बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत बाळंतिणीने हळदीचे सेवन करत राहावे.

  • कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असता दोन आठवड्यांसाठी अर्धा चमचा हळद

  • तुपाबरोबर सेवन करण्याची पद्धत आहे.

  • कानातून पाणी किंवा पू येत असेल तर हळद, वावडिंग व वेखंड यांची धुरी घेण्याचा उपयोग होतो.

  • भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर ओली हळद, आले, लिंबाचा रस व मीठ घालून केलेले लोणचे खाण्याचा उपयोग होतो.

  • मधुमेही व्यक्तींनी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण आवळ्याचा रस व मधाबरोबर घेण्याचा उपयोग होतो. पाव चमचा हळद व पाव चमचा दालचिनी चूर्ण एकत्र करून रोज सकाळी गरम पाण्याबरोबर घेणेही मधुमेहावर उपयोगी असते. बरोबरीने नियमित चालणे, सूर्यनमस्कार घालणे, पथ्य पाळणे हेसुद्धा आवश्यक होय.

  • वारंवार आवाज बसणे, घसा खाकरावा लागणे, कफाची सर्दी होणे यासारख्या त्रासात हळदीने संस्कारित दूध घेण्याचा उपयोग होतो. कपभर दुधात पाव कप पाणी व अर्धा चमचा हळद मिसळून मंद आचेवर पाणी उडून जाईपर्यंत उकळावे व सुती कापडातून गाळून घेऊन साखर मिसळून पिण्यासाठी वापरावे.

अशा प्रकारे हळद हे अत्यंत उपयुक्त द्रव्य होय. आवश्यकतेनुसार हळदीचा उपयोग केला तर आरोग्या कायम निरोगी राहाण्यासाठी फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.