'ही' पाच फळं नियमित खाल्ल्याने वजन होईल कमी!

नियमित व्यायामाबरोबरच योग्य आहार घेतल्याने वजन कमी होऊ शकते
fruits for weight loss
fruits for weight loss
Updated on

Fruits for Weight Loss: कोरोना कमी झाला असला तरी लोकांना घरून काम करणे आवडू लागले आहे. पण असे काम करताना शरीराची हालचाल कमी होते आहे. मात्र काही लोकं सकाळ, संध्याकाळ वॉक आवर्जून घेत आहेत. शरीराची जितकी हाचलाच होते तितक्या कॅलरीज जास्त बर्न होतात. पण असं करणे नियमित जमले नाही तर मात्र तुम्हाला आहारात (Diet) बदल करावे लागतात. काही फळांमध्ये वजन कमी (Weight Loss) करण्याचे गुणधर्म असतात. भरपूर जीवनसत्त्वे, फायबरसह इतर अनेक पोषक घटक अशा फळांध्ये (Fruits) असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फळे खाल्ल्याने फायदा होतो. तसेच, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

fruits for weight loss
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन
सफरचंद  Apple
सफरचंद Apple

सफरचंद - सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज लागत नाही असे म्हणतात. सफरचंदात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. तर, फायबर खूप जास्त असते. सफरचंद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचेही अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. एका अभ्यासादरम्यान, तीन महिलांच्या गटाला 10 आठवड्यांसाठी दररोज तीन सफरचंद, तीन नासपती आणि तीन ओट कुकीज देण्यात आल्या. ज्यांनी सफरचंद खाल्ले त्यांचे वजन २ पाऊंड (०.९१ किलो) कमी झाले. नासपती खालेल्या महिलांचे वजन १.६ पाऊंड (०.८४ किलो) कमी झाले. तर, ओट कुकीज खालेल्ल्या महिलांच वजन अजिबात कमी झाले नाही.

fruits for weight loss
Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी
टरबूज
टरबूज

टरबूज - वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात भरपूर टरबूज खा. टरबूजात पाण्याचे प्रमाण जास्त असते, तसेच कॅलरीज खूप कमी असतात. टरबूजातील फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, लायकोपीन हे घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. तुम्ही स्मूदी, सॅलड, ज्यूसही पिऊ शकता. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने डिहायड्रेशन होत नाही.

fruits for weight loss
शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

पपई- पपई आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यात भरपूर फायबर असते. तसेचपोटासाठी हे सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. पपई खाल्ल्याने वजनही कमी होते. त्यात कॅलरीज कमी असतात. रोज पपई खाल्ल्याने चयापचय वाढतो.

fruits for weight loss
पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खाऊन कमी करा वजन!
berry
berry

बेरीज- बेरीजमध्ये असलेल्या काही घटकांमुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. बेरीत कॅलरीज आणि इतर अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये फक्त 50 कॅलरीज असतात, तसेच आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज देखील मिळते. बेरीच्या सेवनाने उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, उच्च रक्तदाब, जळजळ या समस्या कमी होतात.

fruits for weight loss
वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन
Orange
Orange

संत्र- इतर आंबट फळांच्या तुलनेत संत्र्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तर, व्हिटॅमिन सी, फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. संत्र खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. संत्र्यांचा रस प्यायल्याने पोट भरलेले राहते. शिवाय भूक कमी लागते. कॅलरीज कमी प्रमाणात जातात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ज्यूस पिण्याऐवजी संत्री खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.