Winter Friendly Food : हिवाळ्यात बनवा गूळ भाताची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

हिवाळा आणि गोड पदार्थांची वेगळीच गट्टी
Winter Friendly Food
Winter Friendly Foodesakal
Updated on

Winter Friendly Food : हिवाळा आणि गोड पदार्थांची वेगळीच गट्टी म्हणावी लागेल, हिवाळा सुरू झाला की पहिला विचार येतो गरम गरम गाजऱ्याच्या हलव्याचा. आईच्या हातचा गरमागरम गाजराचा हलवा म्हणजे स्वर्ग सुख. हिवाळ्यात गाजराचा हलवा, खीर, शेंगदाण्याची चिक्की या गोष्टी आपल्याला हमखास खायला सांगतात कारण या गोष्टी फक्त चवीला टेस्टीच नसतात तर त्वचेसाठी हेल्दी सुद्धा असतात.

Winter Friendly Food
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

पण पारंपारिक भारतीय रेसिपींमध्ये आणखीन एक खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे जी तुम्हाला खूप आवडू शकते. ती म्हणजे गुळाचा भात. तुम्ही नारळी भाताच किंवा गोड भाताच नाव ऐकलं असेल पण हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे.

Winter Friendly Food
Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

गूळ आणि तूप यांचं मिश्रण हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करते. शिवाय याने शरीराला उब मिळू शकते. हा पदार्थ सायनस साफ करायला मदत करत. या रेसिपीची सर्वात छान गोष्ट म्हणजे यासाठी लागणार साहित्य हे आपल्या स्वयंपाकघरातच सापडेल.

Winter Friendly Food
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

गुळ भाताची रेसिपी

साहित्य :

1. इंद्रायणी किंवा लोकवन तांदूळ

2. गूळ

3. बदाम - 4-5

4. पिस्ता 4-5

5. तूप (गरजेनुसार)

6. फळे (आवडीनुसार)

7. वेलची 2-3

8. लवंग 2-3

Winter Friendly Food
Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

कृती :

1. एका कढईत पाणी उकळायला ठेवा. त्यात तांदूळ, वेलची आणि लवंगा घालून शिजवून घ्या.

2. भात शिजला की तो बाजूला काढून घ्या.त्यातली वेलची आणि लवंग बाजूला काढून घ्या.

3. वेगळ्या पॅनमध्ये थोडे तूप घाला. त्यात भात घालून छान परतवून घ्या.

4. आता यात गूळ टाकून छान मिक्स करा. गूळ व्यवस्थित आटला की यात तुम्हाला आवडतील त्या फळांचे काप करून छान मिक्स करा.

5. बदाम आणि पिस्ताच्या कापांसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.