Winter Recipe: वर्षेभर टिकणारा आवळ्याचा मोरावळा कसा तयार करायचा?

आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.
Amla Muramba
Amla MurambaEsakal
Updated on

Amla Muramba : आवळा हा दिवाळी नंतर साधारण तुळशीच्या लग्नापासून बाजारात यायला लागतो. ते डिसेंबर पर्यंत असतो. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदम परिपक्व म्हणजे वर्षाचे लोणचे,सुपारी,मोरावळा करण्यास योग्य असे आवळे असतात. 

आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.आवळ्यामधे लोह व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.कोणत्याही रुपात आवळा खाल्ला तर तो आरोग्यदायी आहे.परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साठविला जातो.

आवळा खाल्याने दृष्टि तेज होते. पित्त, कफ कमी होते. त्वचेला चमक येते व त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच ह्रदयासाठी पण आवळा उत्तम आहे. रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आवळ्यापासून बरेच पदार्थ करून वर्षभरासाठी साठविले जातात. जसे की, सुपारी,आवळा कँडी, लोणचे, सरबत, मुरांबा. केस काळेभोर रहाण्यासाठी केसांनाही लावण्यासाठी आवळा सुकवून पावडर करून ठेवली जाते. अशा बहूगुणी आवळ्याचा 'मुरंबा' म्हणजेच 'मोरावळा' कसा करायचा याची सविस्तर रेसिपी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत  

Amla Muramba
Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

साहित्य 

अर्धा किलो आवळे 

अर्धा किलो गुळ  

वेलचीपूड आवडीनूसार

सुंठ पावडर आवडीनूसार

सैंधव मीठ चिमूटभर

Amla Muramba
Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

कृती :-

मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून घ्यावेत. असे आवळे रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात.

सर्वप्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला आतपर्यंत टोचून छिद्र पाडावीत.

आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात.आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी.

एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी गुुळ विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे.

गुळाचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको.

गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड - तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय वर्षभर टिकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.