Winter Recipe: आरोग्यवर्धक लवंगी चहा कसा तयार करायचा?

लवंग दिसायला अगदी छोटीशी असली तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत.
 clove tea
clove tea Esakal
Updated on

Health Tips: लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोक लवंग वापरतात. याशिवाय लवंगात अँटीसेप्टिक, अँटीवायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील असतात, जे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देतात.

1) लवंग दिसायला अगदी छोटीशी असली तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. अनेक आजार आहेत ज्यावर औषध म्हणून आयुर्वेदात घरगुती पदार्थ मग त्यात मसाले असो किंवा इतर अन्नपदार्थ यांचा रामबाण उपाय म्हणून वापर सांगण्यात आला आहे. 

2) सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज 3-4 चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

3) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.

4) लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते.

 clove tea
Winter Recipe: हिवाळ्यात गाजर आणि मुळ्याचं मसालेदार लोणचं खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा...

आजच्या लेखात आपण लवंग टाकून चहा कसा तयार करायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यासारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. याशिवाय पोटदुखी, फुगणे आणि मळमळ यासारख्या समस्यांवरही लवंग उपयुक्त ठरत आहे.

 clove tea
Winter Recipe : हिवाळ्यात पारंपरिक पध्दतीने हरभऱ्याची भाजी कशी तयार करायची?

साहित्य:

1) तिन लवंगा

2) एक कप पाणी

3) मध

4) तुळशीचे पान

कृती:

लवंग चहा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी घाला. मग त्यात लवंगा टाकून नीट उकळा.यानंतर तुळशीचे पाने घालून किमान 3-5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. नंतर तयार चहा एका कपमध्ये गाळून घ्या. आपण आपल्या चवीनुसार मध देखील घालू शकता. आता तुमचा गरमागरम लवंगी चहा तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()