Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

आयुर्वेदानुसार मेथीचे सेवन अनेक रोग आणि समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
Winter Recipe
Winter RecipeEsakal
Updated on

मेथीचे लाडू उत्तम आरोग्य राखण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.  मेथीच्या दाण्यांचेच नव्हे तर त्याच्या पानांचे सेवन देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार मेथीचे सेवन अनेक रोग आणि समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. मेथीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे आणि त्याच्या गुणधर्मांमुळे, ते आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापरले जाते.

मेथीमध्ये असलेले आयर्न, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि झिंक, व्हिटॅमिन सी यांसारखे गुणधर्म ते खूप उपयुक्त बनवतात. यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे त्याची उपयुक्तता आणखी वाढते. मेथीपासून बनवलेल्या लाडूंचे सेवन आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मेथीचे लाडू रोज खाल्ल्याने सांधेदुखीसह अनेक गंभीर समस्यांमध्ये फायदा होतो.  

आजच्या लेखात आपण मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

साहित्य:

1) मेथीचे पिठ एक वाटी

2) पाच वाट्या गव्हाचे पिठ

3) दोन वाट्या रवा

4) 100 ग्रॅम डिंक

5) 50 ग्रॅम अळीव

6) दोन वाट्या सुके खोबरे

7) पाच वाट्या गुळ

8) सुंठपावडर

9) साजुक तुप

10) खारीक पावडर

11) काजु बदामचे बारीक तुकडे

Winter Recipe
Vidarbha Special Recipe: गावरान तुरीच्या सोल्याची आमटी कशी तयार करायची?

कृती:

मेथीचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो. नंतर सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्यावे.काजु बदाम बारीक करुन घ्यावे.

तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळावा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करून .चमचाभर तुपात अळीव तळून घ्यावे. भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्यावे व भाजल्यावर एका परातीत काढावे.

त्या पिठात भिजत घातलेले तुप भाजलेल्या पिठा घाला व हाताने चांगले फेसुन मेथिच्या पिठाच्या गुठळ्या मोडाव्या.आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले काजु बदाम खारीक पावडर घालावी.

सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.आता एका मोठ्या भांड्यात एक चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाकावे. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा.

गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.

आता पटापट लाडू वळून घ्यावे अशा रितीने मेथीचे पौष्टीक लाडू तयार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.