Methi Pithal Recipe: मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो.
मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. आजच्या लेखात आपण मेथीच्या भाजीचं पिठलं कस करायच याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य:
एक वाटी बेसन पीठ
एक वाटी निवडलेली मेथीची भाजी
दोन कांदे
एक टोमॅटो
एक चमचा लसूण आल पेस्ट
चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
हळद
हिंग
लाल मिरची पावडर
जिरे
मोहरी
पाणी
चवीप्रमाणे मीठ
कोथिंबीर
तेल
लिंबू रस
कृती:
सर्वप्रथम कढई मधे दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी हिंगाची फोडणी द्यावी. त्यामध्येच फीरवी मिरची टाकून बारीक चिरलेला कांदा टाकून ते चांगले परतून घ्यावे.
कांदा लाल होता त्यामध्ये ठेचलेला आले-लसूण पेस्ट टाकावी.कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकून ते सुद्धा चांगले परतून घ्यावे त्याने थोडे मऊ झाले की त्यामध्ये लाल तिखट हळद टाकून मसाला चांगला परतून घ्यावा.
मसाल्याला तेल चुकली होती त्यामुळे चिरलेली मेथीची भाजी टाकावी व परतून घेऊन झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढावी.बेसना मध्ये पाणी टाकून बेसन पातळ करुन घ्यावे.
झाकण काढून मेथीच्या भाजीवर हे बेसनाचे मिश्रण ओतावे. आपल्याला पिठलं किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी टाकावे. चवीप्रमाणे मीठ टाकावे चांगले ढवळून घ्यावे.
गॅस मंद करून वर झाकण ठेवावे व परत दोन मिनिटं वाफ काढावी. मस्त झणझणीत मेथीचा पिठलं तयार, वरून कोथिंबीर आणि लिंबू चा रस टाकून गरमागरम पिठलं भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.