Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
onion chutney
onion chutneyEsakal
Updated on

onion chutney: कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. कांद्याचा वापर कोशिंबिरीसाठी, भाजी कलसण्यासाठी म्हणून केला जातो. 

खरं तर कांद्यामध्ये अशा अनेक पोषकतत्त्वे आणि गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांवर याचा फायदा होतो. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठीही कांद्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. शरीराच्या पोषणासोबतच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठीही याचे सेवन फायदेशीर ठरते.

आजच्या लेखात ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत. ओल्या कांद्याची चटणी चवीला तर चवदार लागतेच शिवाय ती हिवाळ्यात आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. 

कांद्याची चटणी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

1) सात ते आठ ओले कांदे 

2) लसूण पाकळ्या

3) तेल

4) दोन ते तीन चमचे चिंच

5) कोथिंबीर

6) मीठ

7) एक चमचा बडीशेप

8) एक चमचा जीरे

9) लाल मिरची

10) मेथी दाणे

11) एक चमचा उडीद डाळ

onion chutney
Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

कृती:

कांद्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून नीट धुवून घ्या. यानंतर कांद्याचे पातळ काप करून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये एक चतुर्थांश कप तेल टाका आणि त्यात लसूण पाकळ्या काही सेकंद शिजवा. आता त्यात चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर शिजवा. कांदा जास्त लाल होणार नाही याची काळजी घ्यावी. आता त्यात चिंच घाला. आता गॅसची आंच मंद करुन घेऊन कांद्याबरोबर चिंच शिजवून घ्यावी. आता गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.आणखी एक लहान पॅन घ्या. त्यात धणे, बडीशेप आणि जिरे घालून मंद आचेवर भाजून घ्यावी. काही सेकंदांनंतर त्यात अख्खी लाल मिरची घाला. आता गॅस बंद करून त्यात थोडे मेथीचे दाणे टाका. आता हे मसाले थंड झाल्यावर ग्राइंडरच्या मदतीने बारीक करून घ्या. आता एका भांड्यात मसाले काढा. यानंतर तुम्ही कांद्याचे मिश्रणही बारीक करा. कांद्याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात तयार केलेला कोरडा मसाला टाका आणि मिक्स करुन घ्या. तुमची कांद्याची चटणी रेडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.