मराठवाड्यातील आणि विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ म्हणजे कढीगोळे याच कढीगोळ्यात मेथी टाकून त्याची चव वाढवणारा एक भन्नाट पदार्थ आज आपण करणार आहोत. खरं तर आता हिवाळा सुरु झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालेभाज्या सहजच उपलब्ध होत आहेत.याच पालेभाजेतील एक भाजी म्हणजे मेंथी याच मेंथीचे कढीगोळे कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
साहित्य
1) एक जुडी मेथी
2) तीन वाट्या ताक
3) दोन वाटी बेसन पीठ
4) तूप
5) जिरे
6) तमालपत्र
7) दोन-तीन लवंगा
8) मीठ
9) साखर
10) तेल
11) लाल सुक्या मिरच्या
12) आलं लसून पेस्ट
कृती:
मेथी कढीगोळे करण्यासाठी सुुरूवातीला आपली कढी नेहमीची करून घेऊ या...म्हणजे सुरूवातीला तुप जिरे तमालपत्र आणि लवंगा घालून फोडणी देऊन त्यात तीन वाट्या ताक आणि त्यात अगदी थोडेसे म्हणजे चमचाभर डाळीचे पीठ घालून फोडणी वर ओतावे. अंदाजाने मीठ आणि साखर घालून उकळायला ठेवावे.
आता बघू या मेथीचे गोळे कसे तयार करायचे?
सुुरुवातीला मेथी धुवून, पुसून आणि बारीक चिरून घ्यावी. मेथी निट पुसून घेतली तर बरे कारण पाणी जास्त झाले तर गोळे फुटतील आणि मग कढीगोळ्या ऐवजी मेथीची ताकातली भाजी खावी लागेल! कोरड्या झालेल्या मेथीत दोन वाट्या बेसन पीठ घालावे थोडे मीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे. हे मिश्रण घट्ट भिजवावे जेणेकरून त्याचे गोळे उत्तम तयार होतील.
मिश्रण घट्ट झाले की हाताला तेल लावून गोळे करून घ्यावेत.गोळ्यांमध्ये आता आवडत असेल तर जिरे धणे पूड, ओवा, लसुण घालता येईल. हिरव्या मिरच्या वाटून घालता येईल. तिखट पण चालेल. गोळे तयार होईपर्यंत कढीला एक उकळी आली असेल. अत्यंत महत्त्वाचे आहे की कढी ला एक उकळी आल्याशिवाय गोळे त्यात सोडायचे नाहीत. आता हळू हळू एकेक गोळा सोडायचा आणि अजिबात न हलवता झाकून दहा ते पंधरा मिनिटं गोळे होऊ द्यायचे.गोळे शिजल्याची खूण म्हणजे ते आकाराने मोठे होतात आणि कढीच्या वर तरंगू लागतात.
कढी गोळ्यात महत्वाची ठरते ती म्हणजे वरून घातलेली फोडणी! छोट्या कढई तेल चांगले गरम करून हिंग आणि मोहरी घालावी. तडतडली की लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि गॅस बंद करावा. सुक्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होतात. नंतर त्यावर दोन चमचे लाल तिखट घालावे आणि फोडणी दुसर्या एका वाटीत काढून घ्यावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.