Winter Tea Recipe: नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून थंडीचं प्रमाणही वाढल्याचे जाणवते. थंड वातावरणात गरम गरम चहा हवा हवासा वाटतो. तुम्हालाही थंडी स्पेशल मसालेदार चहा पिण्याची इच्छा होत असेल तर ट्राय करा ही सोपी रेसिपी. तुमचा दिवसही चांगला जाईल आणि तुमचा माइंडही फ्रेश राहील.
थंडी स्पेशल मसाला टी काही मिनीटांत बनून तयार होईल. फूड ब्लॉगर पारुल हिने थंडी स्पेशल मसाला टीची ही रेसिपी तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केली होती. तुम्हीही ही टी सहज बनवू शकता.
थंडी स्पेशल मसाला टी ची रेसिपी
आधी पॅनमध्ये हिरवी विलायची, काळे मीरे, लवंग, दालचिनी, सोप आणि मोठ्या विलायचीचे दाणे घ्या.
आता पॅनला गॅसवर ठेवा आणि हलक्या आचेवर त्याला होऊ द्या.
या मसालेदार गोष्टी हलक्या ड्राय रोस्ट केल्यानंतर गॅस बंद करा. (Recipe)
आता यातं सूंठ पावडर घाला.
रोस्ट (भाजलेल्या) केलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून त्याचं मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.
तुम्ही या पावडरला एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही तुम्ही चहा बनवता तेव्हा या मसाल्याचा वापर तुम्ही चहामध्ये करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.