हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बनवा पौष्टिक सुप ; जाणून घ्या रेसीपी

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बनवा पौष्टिक सुप ; जाणून घ्या रेसीपी
Updated on

थंडीला सुरवात झाली की, आठवते ते स्वेटर. शरीराला ऊब मिळावी यासाठी मग खाण्यापासून ते कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला जातो. या दिवसात खास हिरव्या भाज्या, सूप आणि हर्बल टी आपल्या शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. याचबरोबर प्रत्येकाने या दिवसात आपल्या आहारात बाजरीचा समावेश केला पाहिजे. बाजरीपासून खूप वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. या हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही याचे सूप करून पिऊ शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बनवा पौष्टिक सुप ; जाणून घ्या रेसीपी
दिवाळीत ट्राय करा दुधी भोपळ्याची पुरी ; जाणून घ्या रेसीपी

बाजरीचे फायदे

बाजरीत फायबरचे भरपूर प्रमाण असते. जे शरीरातील पाचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते. यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहते.मधुमेह असणाऱ्या लोकांना याचा चांगला फायदा होतो. मधुमेहाला मॅनेज करते. शिवाय शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते.बाजरी एक असे कार्बोहायड्रेट आहे जे हळूहळू पचनक्रिया सुधारते. याचा फायदा वजन नियंत्रणात राहण्यासाठी होतो.बाजरी ओमेगा-3 फॅट्स, लोह आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. यामुळे रक्तदाब कमी करणे, ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करते. तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी हे सुप पिणे गरजेचे असते.

असे बनवा सुप

बाजरीचे सुप बनवण्यासाठी बाजरीचे पिठ कढईत थोडे तेल घालून भाजून घ्या. यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. आता यात पाणी आणि दही घाला. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर यात बाजरीचे पिठ घाला. एकसारखे मिक्स करून घ्या. पिठात गुठळ्या होऊ नयेत म्हणून त्याला एकसारखे हलवत रहा. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. झाले सुप तयार.

टिप: तुम्ही हे पिठ पाण्यात शिजवून नंतर ताक किंवा दही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.