World Milk Day 2024: सकाळी पोटभर नाश्ता करायचा असेल तर झटपट बनवा दुधाची दशमी

Dudhachi Dashmi Recipe: सकाळी नाश्त्यात दुधापासून चवदार दशमी बनवू शकता. यामुळे दिवसभर पोट भरले राहील. तुम्हाला थकवा जाणवणार नाही.
Dudhachi Dashmi Recipe:
Dudhachi Dashmi Recipe:Sakal
Updated on

Dudhachi Dashmi Recipe: जगभरात दरवर्षी १ जून हा दिवस 'जागतिक दूध दिन' म्हणून साजरा केला जातो. दूध आरोग्यासाठी फायदेशीर असते. दूधामध्ये अनेक पोषक घटक असतात. दूधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. या दिनानिमित्त सकाळी नाश्त्यात दुधापासून चवदार दशमी बनवू शकता. यामुळे दिवसभर पोट भरले राहील. तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. दशमी बनवणे सोपे असून चवदाक देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया दुधाची दशमी कशी बनवतात.

दुधाची दशमी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ वाटी तांदळाचे पीठ

१/२ वाटी गव्हाचे पीठ

चवीनुसार मीठ

पीठ मळण्यासाठी दुध

तेल गरजेनुसार

तूप

दुधाची दशमी बनवण्याची कृती

सर्वात आधी तांदळीचे आणि गव्हाचे पीठ एकत्र करावे. नंतर त्यात अर्धा चमचा तेल आणि दूध घालून पीठ मळून घ्यावे.

१० ते १५ मिनिटानंतर एक छोटा गोळा घेऊन गोल पोळी लाटून घ्यावी.

नंतर तवा गरम करावा आणि तूप लावून दोन्ही बाजून भाजून घ्यावे.

दुधाची दशमी लसूण चटणी किंवा तूपासोबत खाऊ शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.