Desi superfood in 2021: संपूर्ण जगभरामध्ये यंदा(2021) कोरोना माहामारीचे भय सगळीकडे पसरले होते. कोरोनापासून वाचण्यासाठी संपूर्ण जगभारता रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यावर भर देत आहेत. अशावेळी आपल्या देशात हजारो वर्षांपासून सूरू असलेल्या आयुर्वेदित उपचार पध्दतींचे महत्त्व सर्व जगाला आता समजत आहे. या वर्षी भारतातील काही पदार्थांनी पाश्चिमात्य देशांमध्ये आपली स्वत:ची अशी ओळख बनवली आहे असून त्याला सूपर फूडचा दर्जा मिळाला आहे. सोशल मिडियावर कित्येकांनी पोस्ट केल्या ज्यात, भारतीय आयुर्वेंदातील खजिन्याचे कौतुक केले आहे. (Lookback 2021)
अमेरिका, युरोपमध्ये हळदी, आवळा पासून ते ऑईल पुलिंग आणि योगाची धूम होत आहे. अशाच प्रकारे नारळ तेल, तूप, नाचणीसहित कित्येकदा खाद्य पदार्थांनी विदेशमध्ये सुपर फूडचा दर्जा मिळविला आहे. चला जाणून घेऊ या 2021मध्ये अमेरिका, युरोपसहित कित्येक देशांमध्ये कोणकोणत्या खाद्य पदार्थांची चर्चा झाली.
पूर्ण जगामध्ये या वर्षी आवळ्याची खूप चर्चा झाली. भारतामध्ये आवळ्याचा वापर लोणचं, मुररबा आणि चवनप्राशसाठी केला जातो. विदेशामध्ये हा कार्डियोवॅस्कुलर टॉनिक आणि इम्यूनिटी बूस्टर म्हणून ओळखले जाते. तसेच रक्तातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विदेशातही आवळ्याचे सेवन वाढले आहे. आवळ्यामध्ये असलेले पोलीफिनॉल बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते. कारण क्रोनिक हेल्थ कंडिशनला सुधारतो. आवळ्यामध्ये अंन्टीऑक्सीडेंट्स आणि अन्टी इन्फ्लामेंटरी म्हणूनही ओळखले जाते. त्यामध्ये कॅन्सरसोबत लढण्याची देखील क्षमता असते.
केळ फक्त पाचनक्रिया सुधारण्यासाठी नाही तर आपला मुड फ्रेश करण्याचेही काम करतो. त्यामध्ये उपलब्ध फायबर,पोटॅशिअम, फोलेट, अन्टीऑक्सिडेंटस् आणि व्हिटॅमिन सीमुळे सुपक फूडचा दर्जा प्राप्त केला आहे. केळ हे विदेशात मूड बुस्टर फूड म्हणून ओळखले जाते.
थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये तूप हे ताकद निर्माण करण्यासाठी केला जातो. या वर्षी विदेशामध्ये याची एक वेगळी ओळख मिळत आहे. कित्येक कार्डिओलॉजिस्टनी सल्ला देतात की चपाती किंवा रोटी आणि डाळसोबत ठराविक प्रमाणात तूपाचे सेवन केल्यास ह्रदय हेल्दी राहते. तूपामध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे काही अॅन्टिऑक्सीडेंट्स असतात.
थंडीच्या दिवसांमध्ये भारतात हळदीचा कित्येक आजारांवरील उपचार म्हणून वापर केला जातो. हळद हे भारतीय किंचनमध्ये सर्वात गरजेची वस्तू आहे, ज्यामध्ये क्यूराक्यूमिन (curcumin) उपलब्ध असते जे अन्टीऑक्सिडेंटस गुणांनी समृध्द असते. त्यामुळे हळद एन्टी इंफ्लामेंटरी बनते, जे कॅन्सर सारख्या आजारांसोबत लढण्यासाठी मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.