सासवड : यंदाही गणेशोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र गणेशोत्सवात मूर्तीकारांना जी कमाई होत होती, त्यालाही मूर्ती लहान झाल्याने व उत्सवाला मर्यादा आल्याने.. आर्थिक उत्पन्नाला लगाम बसला आहे. यातूनही वीर (ता. पुरंदर) येथील गणेश मूर्ती कारागीर जोडप्याने सासवडनजिक चांबळी भागात मूर्ती निर्मिती केंद्र स्थापून दोघांत तब्बल 1,100 मूर्ती घडविण्याचा विक्रम केला आहे.
वीर (ता. पुरंदर) येथील मुळचे श्रीकांत कुंभार व त्यांची पत्नी सौ. मयुरी कुंभार यांनी हिवरे व चांबळी गावच्या दरम्यान एक शेड भाडोत्री घेऊन सासवड शहरासह पुरंदर तालुक्याचा पश्चिम भाग मार्केटींगला हाती येईल., या भावनेनं चांबळी गावच्या हद्दीत मूर्ती निर्मिती केंद्र स्थापले. तिथे दिवस - रात्र दोघे पती पत्नी अधिकाधिक तास राबतात. आतापर्यंत पती श्रीकांत कुंभार यांनी अधिक मेहनत केली. तरी त्यांना पत्नी सौ. मयुरी यांनीही मोलाची साथ दिली. त्यामुळे दोघांत तब्बल 1,100 मूर्ती घडविण्याचा विक्रम त्यांच्या कुशल कारागिरीतून झाला आहे.
अगोदर वीर गावी वडील, श्रीकांत व कुटुंबिय मिळून दरवर्षी चार महिने राबून गणेशोत्सवापूर्वीच 500 गणेश मूर्ती साकारत असत. मात्र वडील व कुटुंबियांना तिकडची वीर भागातील जबाबदारी ठेवून... सासवडपासून पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात कारागीर नसल्याने ही पोकळी भरुन काढत, व्यावसायही वाढविण्याचा कोरोनाच्या तोंडावर चांगला प्रयत्न केला. तसेच तब्बल 700 मूर्ती यापूर्वीच बुक झाल्या असून बहुतेक साऱया मूर्ती मार्गी लागतील. कारण बाहेरगावांहूनही आपल्याकडे बुकींग येत आहे, असे श्री. कुंभार म्हणाले.
शाडु मूर्तीचा दर फुटामागे 1,200 रुपये आणि पीअोपीची मूर्ती 300 रुपये फूट दर आहे. दरम्यान, सासवड शहरातही सार्वजनिक मंडळांत नेहमीचा उत्साह, लगबग व उत्सवी रंग दिसणार नाही. मोजक्या भक्तांत धार्मिक विधी पार पडतील., असे पोलीस यंत्रणे संकेत मिळत आहेत. मात्र यंदा प्रथमच पर्यावरणयुक्त गणेशमूर्तींना व तशाच साहित्याला लोक अधिक प्राधान्य देणार असल्याचे प्रतिक्रीयेत दिसून येत आहे. पेणच्या शाडू मातीच्या घरगुती उत्सवातील गणेशमूर्तींचे तर आताच बुकींग सुरु झाले आहे.
कारागिरांना अर्थसहाय्य गरजेचे...
कोरोनामुळे मागील वर्षीच गणेशोत्सवाला लगाम बसला. यंदाही चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींना मर्यादा आहे. त्यामुळे आपोआप मूर्तींची उलाढाल कमी होऊन कारागीरांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. इतर व्यावसायिकांना विविध शासन मदत, अनुदान दिले जाते. तसेच गावगाड्यातील विविध कारागीरांना आर्थिक नुकसानीबद्दल अनुदान किंवा आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी यानिमित्ताने मूर्तीकार व मूर्ती विक्रेते श्रीकांत कुंभार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.