नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात गणेशाची स्थापना होत असते. येथील विविध गणपती प्रसिद्ध आहेत. दहा दिवसांच्या काळात गणपती बघायला नागरिक चांगली गर्दी करीत असतात. मात्र, मागच्यावर्षीपासून सुरू झालेले कोरोनाचे विघ्न यंदाही कायम असल्याने नागरिकांना साध्या पद्धतीने गणेशाची स्थापनापासून विसर्जन करावे लागत आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या राजा गणपतीची साध्या पद्धतीने कोराडी येथील तलावात विसर्जन करण्यात आले.
कोरोनामुळे मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही गणपतीवर निर्बंध लादण्यात आले होते. मूर्ती किती उंच असावी यापासून तर मिरवणुकी किती नागरिकांनी यावे हे सांगण्यात आले. दरवर्षी धूमधडाक्यात गणपतीची मिरवणूक काढली जाते. विसर्जनाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती राहते. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही मिरवणुकीला बंदी घातली होती. त्यामुळे अगदी सध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये नागपूरच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.
रविवारी सकाळी विधिवत पूजाअर्चा आणि आरती करून नागपूरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. चार तासांनंतर नागपूर शहराबाहेरील कोराडी तलावात क्रेनच्या साहाय्याने बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी वातावरण काहीसे भावनिक झाले होते. दरवर्षी वाजत गाजत विसर्जनाची मोठी मिरवणूक निघत असते. यात शेकडो नागरिक सहभागी होतात. मात्र, यंदा मिरवणुकीवर बंदी असल्याने साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.