गणेश चुतुर्थी म्हणजे लोकांच्या आनंदाच्या पर्वणीचा सण होय. या दिवसांत लोकांत उत्साहाचे वातावरण असते. घरोघरी बाप्पाचे आगमन थाटामाटात, ढोल-ताशांच्या जल्लोषात केले जाते. (Ganesh Chaturthi 2021) घरी, सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. ११ दिवस घरोघरी प्रसन्नतेचे आणि भक्तीमय वातावरण असते. विधीवत पूजा-अर्चना करुन ११ व्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. (Ganesh Festival 2021) 'पुढच्या वर्षी लवकर या...!' म्हणत गणरायाला निरोप दिला जातो. याच गणेशोत्सवा संदर्भातील काही खास गोष्टींची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दुर्वांची आवड असणारा एकमेव देव -
हिंदुंच्या विविध देवतांमध्ये त्यांच्या आवडत्या अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. मात्र गणराया हा एकमेव असा देवता आहे, ज्याला दुर्वा वाहिल्या जातात. यापाठी एक आध्यात्मिक कहाणी सांगितली जाते. ती अशी, फार पूर्वी एका अगलासुर राक्षसाने ऋषिमुनींना गिळण्यास सुरुवात केली. त्यावेळी गणेशाने त्याला गिळूण टाकले. यावेळी त्याच्या पोटात धगधग होऊ लागली. ती आग शांत करण्यासाठी कश्यप ऋषिंनी त्यांना दुर्वा दिल्या ज्यामुळे गणरायाची ती आग शांत झाली.
लिखणासाठी विशेष क्षमता -
गणेशाला लिखाणामध्ये कुशल मानले जाते. त्यांना यासाठी काही खास क्षमताही लाभल्या आहेत. व्यास ऋषींना महाभारत लिहण्यासाठी एका अशा व्यक्तीची आवश्यकता होती जे हे लेखन पेलु शकेल. तेव्हा गणरायाने हे महाभारताचे लेखन केले आहे.
उंदीरमामा बद्दल -
उंदीर हे गणेशाचे वाहन आहे, हे सर्वांना माहित आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, एका राक्षसाला गणेशाने उंदिर बनवले होते. मात्र त्याच्या अथक विनंतीनंतर गणरायाने त्याला वाहन बनवले. तेव्हापासून गणेशाला मूषकराज असेही म्हटंले जाते.
लाल सिंदुर आणि मोदक प्रिय
गणेशाला दोन गोष्टी सर्वात जास्त प्रिय आहेत. त्या म्हणजे मोदक आणि दुसरा म्हणजे अष्टगंध होय. असं मानलं जात की, जर तुम्ही गणरायाला मोदकांचा नैवद्य (Ganesh Festival Special dish) आणि लाल सिंदुर चढवणार असाल, तर गणेशा तुमच्या मनातील कोणतीही ईच्छा पूर्ण करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.