Ganesh Chaturthi 2023: तुम्हाला आठवत असेल लहानपणी मोठी माणंस सांगायची की, गणपती बाप्पा आलेत आज चुकूनही चंद्र पाहू नको, तेव्हा फक्त ऐकायचो पण चुकून चद्र दर्शन घेतलं जायचं. त्यामागे एक कथा आहे आणि जर आजच्या दिवशी तुम्ही चंद्राचे दर्शन घेतले. तर, त्यावर काय उपाय करावे हे पाहुयात.
आज चंद्र दर्शन का करू नये?
गणपतीला हत्तीचे मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले. यातच गणपती बाप्पाची शरीर प्रकृती स्थुल होती. मात्र त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेचा सर्वजण आदर करत. पण चंद्र मात्र गणपतीच्या या रुपाला सदैव नाव ठेवत असे. कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता.
एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते. उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला. उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुणूकन खाली पडले. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की "आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही.
जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल". त्यादिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले. गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला. मग त्याने ब्रम्ह देवाला प्रार्थना केली. तेव्हा ब्रम्ह देवाने सांगितले, तुला शाप गणेशाने दिला आहे, त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे. त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर.
शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस "भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी" तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.
त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की, त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. (Ganesh Jayanti 2023)
चंद्र का पाहू नये
पौराणिक कथांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की, आजच्या दिवशी ज्या व्यक्तीने चंद्राचे तोंड पाहीले त्याच्यावर चोरीचा आळ येऊ शकतो. त्यामुळे तुमची प्रतिमा वाईट होऊ शकते. असं म्हणतात की, श्री कृष्णांनीही चतुर्थीचा चंद्र पाहिला होता. त्यामुळे त्यांच्यावर चोरीचा आळा आला होता.
आता पाहुयात तुम्ही चंद्र दर्शन घेतले तर काय करावे, या दोषातून कसे मुक्त व्हावे याचे केंद्रीय संस्कृत विद्यालय पुरी येथील ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांनी सांगितलेला उपाय काय आहे. (Astro Tips)
गणपतीची पूजा करावी
आजच्या रात्री तुम्ही चुकून चंद्राचे तोंड पाहीले.तर, त्याच्या दोषांतून मुक्त होण्यासाठी तुम्ही गणेशाची पूजा करावी. या पूजेसाठी तुम्ही काही वस्तू आणि फळे ठेवावेत. पूजेनंतर फळे आणि वस्तू चंद्राला दाखवावीत. त्यानंत एखाद्या गरजवंताला दान करावीत.
तसेच या मंत्राचा जाप करावा. यामुळे तुम्हाला या दोषातून मुक्ती मिळेल.
सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:
सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.