अवघ्या तीन दिवसांवर बाप्पाचं आगमण आलं आहे. त्यामुळे सर्वांची जोरदार तयारी सुरु आहे. आरास, प्रसाद, डेकोरेशन यामध्ये सर्वजन गुंतले आहेत. अजूनही अनेकांनी डेकोरेशन काय करावे हे सूचत नसेल तर एक उत्तम पर्याय आहे. गणेशाच्या आरासेसाठी तुम्ही फुलांची सजावट करु शकता. यासाठी अनेक फुले आज मार्केटला उपलब्ध झाली आहेत. याशिवाय अनेक नवीन व्हरायटीही बाजारातही आली आहे. (ganeshotsav 2022 flower decoration ideas)
तुम्हाला ओरिजीनल फुलं वापरण्यासाठी नको असतील तर तुम्ही काही नकली फुलांचाही वापर करु शकता. यामुळे तुमचे डेकोरेशन उठून दिसेल आणि ही फुले फार महागही असणार नाहीत. लिली ऑर्किड, गुलाब आणि झेंडू अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून तुम्ही हे डेकोरेशन करू शकता. घरी आरसेसाठी फुलांची सजावट म्हणून तुम्ही या थीममध्ये दोन किंवा तीन रंगांची फुले वापरु शकता. यामुळे बाप्पाची मूर्ती अजून खूलुन दिसेल. आम्ही तुम्हाला यासाठी काही अप्रतिम कल्पना देत आहोत...(Ganesh article)
पडद्यांसह फुलांची सजावट
फुलांच्या सजावटीचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही पडद्यांच्या बाजूला फुले लावू शकता. ऑर्किड किंवा गुलाबासारख्या चमकदार रंगाच्या फुलांची एक फ्रेम तयार करा. त्याला वेगवेगळ्या पानांच्या वेढलेल्या पांढऱ्या कळ्यांनी जोडा. फ्रेमच्या पार्श्वभूमीसाठी पांढऱ्या किंवा क्रीमसारख्या हलक्या रंगाचे पडदे वापरा.
झेंडू आणि गुलाबाची सजावट
तुम्हाला साध्या झेंडूची फुले आवडत असतील, तर ही गणपतीसाठी फुलांच्या सजावटीचा एक पर्याय तुमच्याकडे आहे. यासाठी एक साधा टेबल घ्या आणि चारही बाजूंनी एक फ्रेम बनवा. नंतर ही फ्रेम गुंडाळण्यासाठी चमकदार केशरी झेंडूच्या फुलांची माळ वापरा आणि संपूर्ण टेबल त्याने झाकून टाका. आता वरील सजावटीत गुलाबाचा पुरेपूर वापर करा.
पांढर्या गुलाबाच्या फुलांनी सजवा
पांढरे गुलाब पवित्रता, निष्पापपणा आणि निष्ठा यांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. त्यामुळे गणपतीच्या आरास करताना फुलांच्या सजावट म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी एक चौकोनी चौकट तयार करुन त्याला पांढर्या गुलाबाच्या फुलांनी सजवा. या सजावटीमध्ये हिरव्या पानांचा वापरही करु शकता.
दिवा आणि फुलांची सजावट
जर तुम्ही एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि गणपती मंदिरासाठी जागा कमी असेल तर एक साधी आणि सुंदर रचना निवडा. तुम्ही ही आरासेसाठी दिवा आणि फुलांचा वापर करु शकता. यासाठी दिवे आणि फुलांनी देवघर किंवा गणरायाच्या स्थापनेची जागा सजवा. झेंडू, चमेली, ऑर्किड, गुलाब, विविध रंगांची फुले आणि इतर फुलांनी रांगोळीसारखी रचना करा. हेडबोर्ड किंवा फ्रेममध्ये काही फुले जोडा. यासोबत काही दिवे रांगोळीच्या आत आणि काही मूर्तीजवळ ठेवा.
ऑर्किड, कार्नेशन आणि गुलाबाची सजावट
या गणपतीसाठी फुलांच्या सजावटीत एक आकर्षक मंदिर तयार करा. यासाठी गुलाब, ऑर्किड आणि कार्नेशन या फुलांचा वापर करु शकता. तुम्ही तयार केलेल्या या लहान मंदिराची चौकट सजवण्यासाठी फक्त या फुलांचा वापर करा. हे सोपे असून यामुळे ते मंदिर आणखी सुंदर दिसेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.