लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ Canva
Updated on
Summary

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाने पंढरीत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाने पंढरीत (Pandharpur) एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) साजरा करताना अनावश्‍यक खर्चाला फाटा देत या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मागील 41 वर्षांपासून सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाचे सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ
दाजी पेठेतील वीर गणपती ट्रस्टने जपली समाजसेवेची परंपरा

प्रदक्षिणा रस्त्यावरील सहकार चौक येथील सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाची स्थापना 1980 साली झाली. शहरातील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक असे हे नावाजलेले मंडळ आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास या मंडळाच्या वतीने प्राधान्य दिले जाते. मागील अनेक वर्षांपासून चंद्रभागा नदीला पूर आल्यानंतर पूरग्रस्त भागातील नागरिकांना मंडळाच्या वतीने नावेतून जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्याचा उपक्रम राबवला जात आहे. तर कोरोना महामारीमुळे लॉकडाउनच्या काळात हजारो बेघर व गरजू लोकांना या मंडळातर्फे अन्नदान करण्यात आले. मध्यंतरी चिपळूण येथील पूरग्रस्तांना मंडळाच्या वतीने जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सहकार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे शंभर बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

गणेश मूर्तीचे नदीपात्रामध्ये विसर्जन करण्याऐवजी मंडळातर्फे गणेश भक्तांना कृत्रिम हौदामध्ये मूर्ती विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी समाजातील विविध वंचित घटकांच्या हस्ते मंडळातील गणेश मूतीचे पूजन करण्यात येते. पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मागील चार वर्षापासून गणेश मूर्ती विसर्जन न करता मंडळाच्या वतीने पुढील वर्षी त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यातून बचत झालेल्या निधीचा सामाजिक उपक्रमासाठी सुयोग्य वापर केला जात आहे. सहकार मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ढोल- ताशा व झांज पथक. या मंडळाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पंढरपुरातील आबालवृद्ध चौकाचौकात गर्दी करत असतात. अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक आयोजित केलेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील एक नामवंत पथक म्हणून या मंडळाने नावलौकिक प्राप्त केला आहे.

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ
'सिद्ध होईल पुरुषार्थ, मुलीचा बाप होऊन बघ!'

सहकार गणेशोत्सव मित्र मंडळ हे दरवर्षी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यावर जास्त भर दिला जातो. यावर्षी देखील रोषणाईवर व सजावटीवर खर्च न करता मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

- रामभाऊ गोरे, अध्यक्ष, सहकार गणेशोत्सव मित्र मंडळ, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.