कळंब: श्री चिंतामणी कळंब. यवतमाळ पासून २२ कि.मी.अंतरावर असलेल्या कळंब, जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री चिंतामणीचे मंदिर .अंदाजे हजारो वर्षापूर्वी. पुरातन काळातील. प्रत्यक्ष इंद्राने येथील मूर्तीची स्थापना केल्याचे गणेशपुराणात दाखले.
इतिहास :-
पुरातन काळी मंदिर एका सरोवरात स्थापन करण्यात आले असून जमिनीपासून ३० फूट खोल आहे. मंदिर हेमांडपंथी असून त्याला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून मुख्य प्रवेशद्वारावरच चौमुखी गणेश मूर्ती पाहावयास मिळते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडात ही मूर्ती कोरलेली असून मूर्तीचे हात एकमेकात मिळालेले आहेत. संपूर्ण भारतात येथील एकमेव गणेशाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे असे लोक सांगतात.
अख्यायिका:-
कळंब च्या मंदिराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दर बारा वर्षांनी गंगा अवतरते. या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी- देवांचा राजा इंद्राने गौतम ऋषीच्या पत्नीसोबत व्यभिचार केला केला. त्यामुळे ऋषींनी त्याला शाप दिला. त्यामुळे भयभीत होऊन इंद्र कमळाच्या देठात लपून बसला.हे कळताच सर्व देव गौतमापाशी येऊन गौतमाची प्रार्थना करू लागले व इंद्राला क्षमा करण्याची मागणी करू लागले. तेव्हा गौतम म्हणाले इंद्र दृष्ट कपटी निच अविचारी आहे. तथापि त्याने देवाधिदेव श्री चिंतामणी (गजाननाची) तपश्चर्या केल्यास त्याचा उद्धार होईल. गजाननाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी षडाक्षरी मंत्र दिला. बृहस्पति ने इंद्राला कमळाच्या देठातून बाहेर काढले व त्याला येथील चिंतामणीच्या सरोवरात स्नान करण्यास सांगितले. हजार वर्षे त्याने तपश्चर्या केल्यानंतर श्री चिंतामणी त्याला प्रसन्न झाले व पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. हे ऐकल्यावर इंद्र म्हणाला देवा मला तुझे विस्मरण होऊ नये म्हणून या कदंब वृक्षा जवळ एक कदंब नगरीची स्थापना कर व मी ज्या सरोवरात स्नान केले त्या सरोवरास चिंतामणी सरोवर असे नाव द्यावे. जो या सरोवरात स्नान करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर द्यावा. अशा प्रकारचा वर मिळाल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगेला बोलावून श्री चिंतामणीला स्नान घातले व दर बारा वर्षांनी या ठिकाणी येण्यासाठी तिला आज्ञा केली. यानंतर अनेक वेळा गंगा या ठिकाणीआल्याचे दिसते.नंतर इंद्राणे स्फटिकाच्या दोन फूट उंचीच्या सुंदर गणेश मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली.ती हीच मूर्ती होय. नंतर तो स्वर्गलोकी निघून गेला.
विशेष परंपरा- यात्रा:-
या देवस्थानचा उत्सव गणेश जयंती विनायक चतुर्थी पासून माघ शुद्ध चतुर्थी पासून सुरु होतो. रथसप्तमीला दहीहंडी काला व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम असतो. यावेळी सात दिवस भागवत सप्ताह असतो. सायंकाळी दररोज निरनिराळे कार्यक्रम असतात.यावेळी हजारो भाविक भक्त कार्यक्रमात भाग घेतात.त्यानंतर श्री ची भव्य यात्रा व महोत्सव सुरू होतो. हजारो भाविक भक्त यात्रेला येतात.याच वेळी भव्य बैल बाजाराचे आयोजन केले जाते. देवस्थान कमिटी भक्तांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था केली असून भव्य हॉल व गार्डनची निर्मिती करण्यात येत आहे.
विशेष चमत्कार अनुभव:-
१९९६ साली सप्टेंबर महिन्यात येथे गंगा अवतरली होती. त्यावेळी लाखो भाविकांनी गंगेचे दर्शन घेतले होते. याअगोदर चार वेळा गंगा अवतरल्याचे सांगितले जाते. येथे दररोज सकाळी व सायंकाळी गणेशाची महाआरती होते. गणेशाला मोदकाचा नैवेद्य दिला जातो. या वर्षी फेब्रुवारी२०२० मध्ये यात्रा भरली होती. या वर्षी मार्च मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च पासूनच मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.आता ऑगस्ट २०२० पर्यंत मंदिर बंदच आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.