Mukhshuddhi Modak Recipe : आपण आजवर ड्राय फ्रुट्स मोदक, पेढ्याचे मोदक, चॉकलेट मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा आस्वाद घेतला असेल. पण आपण कधी मुखशुद्धीचे मोदक खाल्ले आहेत का? नाही म्हणता.
चला तर या मोदकांची रेसिपी जाणून घेऊया. या मोदकाच्या सारणामध्ये विड्याची पाने, गुलकंदाचा समावेश असल्याने हे मोदक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात.
साहित्य : किसलेले ओले खोबरे - एक वाटी, गूळ - पाव वाटी, विड्याची पाने - तीन ते चार, बडीशेप - एक चमचा, खसखस - एक चमचा, टूटी-फ्रुटी - एक चमचा, गुलकंद - दोन चमचे, मिल्क पावडर - एक चमचा, वेलची पूड
तांदळाचे पीठ - एक वाटी
दूध - दोन चमचे
तूप - एक चमचा
पाणी - एक वाटी
चिमूटभर मीठ
सर्वप्रथम एका कढईत खोबरे आणि गूळ परतून घ्या.
गूळ विरघळल्यावर त्यात मिल्क पावडर मिक्स करावी.
खसखस, बडीशेप मिक्स मिश्रण चांगले एकजीव करावे.
गॅस बंद करा आणि मिश्रणात गुलकंद, टूटी-फ्रुटी, वेलची पूड, आणि कापलेली विड्याची पानेही मिक्स करावीत.
एका भांड्यामध्ये पाणी, दूध, तूप, मीठ उकळत ठेवा.
उकळी येताच त्यात तांदळाचे पीठ मिक्स करावे.
सर्व मिश्रण ढवळून एकजीव करा.
गॅस बंद करून मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा.
तांदळाची उकड नीट मळून घेऊन त्याचे लहान गोळे करा.
गोळे लाटून घेऊन त्यात सारण भरा.
पारीला कळ्या पाडून मोदकाचा आकार द्यावा.
मोदक १० मिनिटे पाण्यावर वाफवून घ्यावेत.
तयार झालेल्या मोदकांवर तूप घालून सर्व्ह करा.
विड्याच्या पानांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण खूप असते, जे आरोग्यासाठी लाभदायक असते.
तर मग यंदा घरी नक्की करून पाहा मुखशुद्धी मोदक
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.