Ganesh Chaturthi 2023 Recipes अवघ्या काही तासांवर गणपती बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत. दुसरीकडे दहा दिवस बाप्पाला कोणकोणत्या खमंग, स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा;याचीही घराघरांत स्पेशल तयारी सुरू आहे.
बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात, हे सर्वांना माहीतच आहे. पण आपण बाप्पासाठी कधी मोदकाच्या आमटीचा नैवेद्य दाखवला आहे का? मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया या पदार्थाची स्टेप बाय स्टेप रेसिपी...
पांढरे तीळ,काळमिरी,दालचीनी, तिखट मसाला, किसलेले सुके खोबरे, गोडा मसाला, हळद, मीठ, धणे-जीरे पावडर, कांदा, कोथिंबीर, बेसन-तांदळाचे पीठ.
किसलेले सुके खोबरे व पांढरे तीळ व्यवस्थित भाजून घ्या.
यांनतर वरील सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून घ्या व त्याचा मसाला तयार करा.
हवे असल्यास आपण यामध्ये कांदा- कोथिंबीरही मिक्स करू शकता.
आता एका प्लेटमध्ये बेसनचे पीठ व तांदळाचे पीठ एकत्र घ्या व त्यामध्ये थोडासा मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला व वितळवलेले तूप मिक्स करा व आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून कणिक मळून घ्या.
आता चिरलेला कांदा व कोथिंबीर आणि तयार केलेला मसाला एकजीव करून घ्यावा.
पुन्हा थोडेसे किसलेले सुके खोबरे कढईत भाजून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा
त्यामध्ये कांदा परतून घ्यावा यानंतर लसूण व आल्याचे काप परतून घ्यावेत.
यानंतर आणखी एका प्लेटमध्ये एक चमचा हळद, मसाला, धणेजीरे पावडर आणि चवीपुरते मीठ घ्यावे.
परतलेला कांदा, लसूण, आल्याचे काप व सर्व मसाला, कोथिंबीर एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून मसाला तयार करा.
आणखी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा व मोहरी-जिऱ्याची फोडणी द्या व त्यामध्ये तयार केलेला मसालाही मिक्स करावा.
यानंतर कढईमध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावे. थोड्या वेळासाठी कढईवर झाकणही ठेवावे.
दुसरीकडे कणकेची पातळ पारी तयार करा आणि त्यामध्ये सारण भरा. मोदक आकाराने लहानच तयार करावेत, हे लक्षात घ्या.
आता उकळत ठेवलेल्या आमटीमध्ये तयार केलेले मोदक अलगद सोडावेत आणि वरून कोथिंबीर सोडावी.
तयार झाली आहे मोदकाची खमंग आमटी.
Content Credit Instagram @marathi_food_blogger_pune
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.