Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023esakal

Ganesh Chaturthi 2023 : परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी गणपती नक्की कोणत्या तारखेला बसवावा? इथे वाचा

तुम्ही किंवा तुमचे आप्तस्वकीयसुद्धा परदेशात राहत असतील आणि त्यांना त्यांनाही हाच प्रश्न पडला असेल तर ही माहिती त्यांच्यासाठीच
Published on

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पा हे अनेकांचं लाडकं दैवत. भक्त आतुरतेने बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असून बाप्पाच्या आगमनासाठी भारतातील अनेक शहरांत जोरदार तयारीदेखील सुरु झाली आहे. मात्रा बाप्पाचे काही भक्त भारताबाहेरसुद्धा आहेत. अशा वेळी परदेशातील आणि भारताची वेळ वेगवेगळी असल्याने त्यांनी नेमकी बाप्पाची स्थापन कधी करावी असा प्रश्न पडतो. तुम्ही किंवा तुमचे आप्तस्वकीयसुद्धा परदेशात राहत असतील आणि त्यांना त्यांनाही हाच प्रश्न पडला असेल तर ही माहिती त्यांच्यासाठीच.

संपूर्ण अमेरिका खंडामध्ये, युरोप खंडामध्ये जसे की, लॉस एंजेलिस, वॉशिंगटन, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, वॉरसॉर, रोम, जिनेव्हा, सेंट पिटर्सबर्ग, मॉस्को यांसारख्या रशियातील शहरांत त्याचबरोबर अबुडाबी, कराची, सिंगापूर, जकार्ता आणि संपूर्ण भारत देशात १८ सप्टेंबर रोजी गणपती बसवण्यात येईल.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : मातीच्या गणेश मूर्ती विक्रीची ठिकाणे एका क्लिकवर

त्याचबरोबर फिलीपाइन्समध्ये, अँटी पोलो, हाँगकाँग, संपूर्ण जपान देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये १९ सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना सूर्योदयापासून ते दुपारी दीडे ते दोन वाजेपर्यंत करावी. गणपतीची पूजा विधीवत केल्याने तुम्हाला त्याचे शुभ फळ नक्की मिळेल. (Lord Ganesha)

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी नेमकी 18 सप्टेंबरला की 19 ला? पचांगकर्त्यांकडून जाणून घ्या योग्य तारीख

ज्योतिष व सर्व शास्त्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे काशीचे प्रकांड पंडित श्री गणेश्वरशास्त्री द्रवीड गुरुजी व धारवाडचे पंडित राजेश्वर शास्त्री उप्पिनबेट्टिगिरी यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच भारतातील तमाम सनातन सूर्यसिद्धांत पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी नसून 18 सप्टेंबर या तारखेस आहे याची कृपया सर्व श्रद्धावान गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.' असे पंचांगकर्ते देशपांडे यांनी सांगितले आहे. (Ganesh Chaturthi Festival)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.