Ganesh Chaturthi Best Wishes: महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबराला साजरी केली जाणार आहे. सर्व गणेश भक्त गणरायाच्या आगमनासाठी आतुर झाले आहे.
हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्यादूर होतात. तसेच गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक , लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
गणेश चतुर्थीनिमित्त जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना मराठीत भक्तीमय शुभेच्छा देऊ शकता. यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल.