Ganpati Rangoli Design 2024: देशभरात गणेशोत्सव जल्लोषात आणि मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे चारच दिवस उरले. यंदा यंदा ७ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठही सजली आहे. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती आल्या आहेत. दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात ढोल ताशांच्या गजरात साजरा केला जातो. या दिवशी काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते.
कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणपती बाप्पांची पूजा करून केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास कामामध्ये यश मिळते. गणरायाला लाल जास्वंद आणि मोदक खुप प्रिय आहे. गणेशोत्सवात विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास अनेक संकटांमधून सुटका होते.
जर तुम्हीही तुमच्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करणार असाल तर घराची सजावट करणे खूप गरजेचे आहे. घराच्या प्रवेशद्वारावर फुलांच्या माळांनी सजवू शकता आणि घराच्या अंघणात सुंदर रांगोळ्या काढून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.