Baby Boy Name Of Lord Ganesha: हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात गणेश पुजनाने केली जाते. मान्यतेनुसार गणरायाच्या आशीर्वादाने कोणत्याही कामाची सुरूवात केल्यास कामात अडथळे येत नाही.
भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षात 'गणेश चतुर्थी' साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते. देशभरात गणेशोत्सव ढोल-ताश्यांच्या गजरात साजरा केला जातो.
यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.
गणेशोत्सवाच्या आधी किंवा या दिवशी गोंडस बाळाने तुमच्या घरी आगमन केले असेल तर लाडक्या गणरायाच्या नावावरून मुलांचं नाव ठेऊ शकता. गणरायाच्या प्रत्येक नावाचे अर्थ जाणून घेऊया.