Ganpatipule : दोन हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन

गणपतीपुळेत वर्षातून एक दिवसच पर्वणी
Ganesh Chaturthi 2022 Ganapatipule Two thousand devotees took Padasparshadarshan ratnagiri
Ganesh Chaturthi 2022 Ganapatipule Two thousand devotees took Padasparshadarshan ratnagirisakal
Updated on

रत्नागिरी : ‘एक गाव-एक गणपती’ ही मागील ५०० हून अधिक वर्षांची परंपरा गणपतीपुळेत आहे. त्यानुसार कोरोना काळातील खंडित काळानंतर दोन वर्षांनी आज, गणेश चतुर्थीला थेट गाभाऱ्‍यात जाऊन गणपतीपुळेच्या‘श्रीं’चे पदस्पर्श करून दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गणपतीपुळ्याच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी होत असते. पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. गणपतीचे दर्शन गाभाऱ्‍याच्या बाहेरून घ्यावे लागते. मात्र वर्षातील एक दिवस, भाद्रपद चतुर्थीला गाभाऱ्‍यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा आहे.

गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा हा खुला ठेवला जातो. वर्षातून एकदाच ‘श्रीं’ना पदस्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते. त्या प्रथेनुसार आज पहाटे पूजा आटोपल्यानंतर साडेचार वाजता ग्रामस्थांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मालगुंड, नेवरे, गणपतीपुळे, भंडारपुळे आणि निवेंडी ग्रामस्थांनी दुपारी १२ पर्यंत ‘श्रीं’चे पदस्पर्शाने दर्शन घेतले. शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे पर्यटकांनीही गणपतीपुळेमध्ये हजेरी लावली आहे. त्यांनाही याचा लाभ घेता आला. सायंकाळपर्यंत दोन हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. कोरोनामुळे मागील दोन वर्षे येथील ग्रामस्थांना पदस्पर्शाने दर्शन घेता आलेले नव्हते. ती प्रथा कायम ठेवता आल्याचे समाधान यंदा ग्रामस्थांमध्ये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.