Ganesh Chaturthi 2024:
Ganesh Chaturthi 2024: Sakal

Ganesh Chaturthi 2024: संभाजीनगरात जल्लोषात गणराच्या भव्य मूर्तीचे आगमन

Ganesh Chaturthi 2024: यंदा या मंडळाने तब्बल १३ फुटांची गणेशमूर्ती तयार केली आहे. शहरातील सर्वात मोठी मूर्ती असलेली मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरले.
Published on

Ganesh Chaturthi 2024: पदमपुरा भागातील काका चौकात जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. हर हर महादेव क्रीडा मंडळातर्फे गणरायाच्या मूर्तीची कोकणवाडी चौक (जय टाॅवर) ते काका चौकापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये आबालवृद्धांनी सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे, शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीमध्ये सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती. यंदा या मंडळाने तब्बल १३ फुटांची गणेशमूर्ती तयार केली आहे. शहरातील सर्वात मोठी मूर्ती असलेली मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरले.

Loading content, please wait...