Ganesh Chaturthi 2024 : फुले,फुगे,माळा... बाप्पासाठी कशाची करावी सजावट? ज्यामुळे बाप्पाची आरास होईल एकदम झक्कास!

यंदा तुम्हीही काहीतरी हटके आणि युनिक सजावट करण्याच्या विचारात असाल तर इथे काही सोप्प्या आयडिया आहेत.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024 :

गणपती बाप्पाचे आगमन थोड्याच दिवसात होणार आहे. प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या सजावटीसाठी रात्र-रात्र जागवल्या जात आहेत. काही लोक किल्ल्यांची प्रतिमा साकारत आहेत. तर, काही लोक तयार गणपती सजावट आणणार आहेत. तर काही स्वत:च्या हातांनी बनवतात.  

बाप्पासाठी तयार मखर आणले जातात. किंवा फक्त प्लास्टिकची फुले वापरून सजावट तयार केली जाते. पण यंदा तुम्हीही काहीतरी हटके आणि युनिक सजावट करण्याच्या विचारात असाल तर इथे काही सोप्प्या आयडिया आहेत. ज्यावर तुम्ही काम करून सहज सजावट करू शकता. (Ganpati Bappa Decoration Ideas 2024)

फुलांची आरास करा

गणपती बाप्पासाठी फुलांची आरास आकर्षक वाटू शकते. तुम्ही आर्टिफिशियल फुले वापरू शकता. पण खरोखरच्या फुलांची कमान, गजरे यांनी केलेली सजावट देखील सुरेख दिसेल. तसेच आजकाल सेलिब्रिटींचा बाप्पा खरोखरच्या फुलांमध्येच विराजमान होतो. त्यामुळे तुम्हीही खरोखरच्या फुलांचे आरास करण्यावरती भर द्या.

 

फुग्यांची सजावट

आपल्याकडे पार्टीला किंवा वाढदिवसाला हमखास फुगे लावले जातात. आज-काल नवरा नवरीच्या स्वागताला ही फुलांच्या आरास केली जाते. सध्या ट्रेंडमध्ये असलेली ही फुग्यांची आरास तुम्ही बापासाठी सुद्धा करू शकता. बाप्पाच्या मागे आकर्षक देखावा म्हणून पूर्ण फुग्यांनी भरलेले भिंत दाखवू शकता.  

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाची आरास एकदम झक्कास! घरातील वस्तूंनी स्वत:च्या हातांनी बनवा बाप्पांसाठी खास सजावट
फुग्यांची सजावट
फुग्यांची सजावटesakal

दिव्यांची सजावट

वेगवेगळ्या दिव्यांची केलेली आरास दिवाळीत आपलं घर उजळून टाकते. अशाच पद्धतीने जर तुम्ही खरोखरच्या दिव्यांची आरास करून बाप्पाचं मखर सजवलं तर ते शुभ दिसेल. कारण दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करतात. तेव्हा तुम्हीही काहीतरी शोभा संकेत असणारी सजावट करणारा असाल तर दिव्यांचा नक्की विचार करा.

तुम्हाला खरोखरचे दिवे वापरायचे नसतील तर तुम्ही आर्टिफिशियल दिवे सुद्धा वापरू शकता. वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे हे दिवे आकर्षक दिसतात.

Ganesh Chaturthi 2024
Gudi Padawa Decoration Idea: गुढीपाडव्याला 'अशी' करा सुंदर सजावट, घराला मिळेल आकर्षक लूक
दिव्यांची सजावट
दिव्यांची सजावटesakal

कागदांची सजावट

रंगीत कागदापासून बनवलेली फुले, पंखे एकमेकात जोडून आकर्षक देखावा साकारू शकता. वेगवेगळ्या रंगाचे कागदाचे तुकडे एकत्र करून तुम्ही एक सुंदर वॉल उभारू शकता.

 

थीम साकारा

तुम्ही थीम बसवून ही तुम्ही बाप्पाची आरास सजवू शकता. ग्रामीण जीवन, शेतकरी बाप्पा, हायटेक सिटी मधला बाप्पा, जंगलातला बाप्पा अशा थीम घेऊन त्यावर काम करू शकता.

Ganesh Chaturthi 2024
Janmashtami Home Decoration: जन्माष्टमीला श्री कृष्णाच्या 'या' आवडत्या गोष्टींनी करा घराची सुंदर सजावट, उत्साहाचा आनंद होईल द्विगुणित
सजावटीतही थीम साकारा
सजावटीतही थीम साकाराesakal

कटआउट्सचा वापर करा

तुम्ही सजावटीमध्ये बाल गणेशा, उंदीर, मोदक, आरतीचे ताट, कलश यांचे कटआउट वापरून ही आरास करू शकता. तुम्ही गणपती बाप्पाच्या मागे एक पांढऱ्या रंगाचा पडदा लावून त्यावरती शंकर-पार्वती तसेच नंदी आणि इतर गणांचे कटआउट लावून हिमालयातील देखावासा करू शकता.

कार्टुनचे कटआउट्स ही वापरू शकता
कार्टुनचे कटआउट्स ही वापरू शकताesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.