Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाची आरास एकदम झक्कास! घरातील वस्तूंनी स्वत:च्या हातांनी बनवा बाप्पांसाठी खास सजावट

Ganpati Bappa Homemade Decoration : विकतच्या सजावटीवर बाप्पांना विराजमान करण्यापेक्षा घरीच आपण काही खास आरास करू शकतो.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 esakal
Updated on

Ganpati bappa household items decoration :

अबालवृद्ध ज्या सणाची वाट पाहत असतात तो गणेश चतुर्थीचा सण लवकरच येणार आहे. तरुण मंडळे आकर्षक देखाव्यांची तयारी करत आहेत. तर घरोघरीही स्वच्छता, सजावट, पारंपरिक पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे. दरवर्षी गणपतीमध्ये आपल्या बापाची आरास कशी सुरेख होईल हेच पाहिल जातं. त्यामुळे गणपती बाप्पासाठी वेगळी आरास लोक शोधत असतात.

गणपती बाप्पासाठी तयार सजावट मिळते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फुलांचे, पुठ्ठ्यांचे देखावे मिळतात. पण अशा विकतच्या सजावटीवर बाप्पांना विराजमान करण्यापेक्षा घरीच आपण काही खास आरास करू शकतो.

गणेश आगमन अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपले आहे. तुम्हीही तुमच्या हातांनी गणपती बाप्पासाठी सजावट कशी करायची हे विचार करत असाल. तर तुम्ही या काही खास आयडिया वापरू शकता. (Ganpati Bappa Decoration Idea's)

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजावर निर्बंध - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

नारळात बसलेला बाप्पा

घरगुती गणपती साठी सर्वात आकर्षक आणि पटकन होणारी सजावट म्हणजे नारळात बसवलेला गणपती. हे ऐकताना थोडं अवघड वाटत असलं तरी ही आरास पटकन तयार होते. नारळ फोडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात. या दोन भागांमध्ये बापाला विराजमान करायचं. आपला बाप्पा श्रीफळामध्ये विराजमान झाला आहे असेच दिसते.

फक्त हा नारळ खरा नसतो तो पुठ्ठा,टप, नारळाच्या शेंड्या यांपासून बनलेला असतो. ही आरास करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या शेंड्या पुठ्ठा अशा घरगुती वस्तूंचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ही सजावट खर्चिक होणार नाही.

किल्ल्यात बसलेला बाप्पा

गणपती बाप्पासाठी दुसरी आणि सोपी आरास म्हणजे किल्ल्यात बसवलेला गणपती. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आपण दिवाळीत बनवतो. पण आत्ता गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी सुद्धा घरामध्ये किल्ले बनवले जातात. ही एक ट्रेडिंग सजावट ठरेल.

यासाठी तुम्हाला पुठ्ठा, रंग, मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी मूर्ती सुद्धा लागेल. तुम्ही संपूर्ण किल्ल्याच्या आकाराची सजावट करणारा असाल तर त्यामध्ये छत्रपतींच्या रूपातील बाप्पा सुद्धा बसवू शकता.

वनराईतील गणपती

घरगुती सजावटीमध्ये हमखास दिसणारी एक सजावट आहे. ती म्हणजे झाडांमध्ये आणि जंगलामध्ये बसलेला गणपती. चारी बाजूला छोटी मोठी झाडे लावून केलेली सजावट सजीव वाटते.

यासाठी तुम्हाला फक्त वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या, फुलझाडे आणि स्टिकरचा वापर करता येईल. आता थ्रीडी लुक देणारे काही पडदे सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही बाप्पासाठी खास वनराईतील बाप्पा बनवू शकता.  

शेतकरी बाप्पा

सध्या हॉटेल, मोठे रेस्टॉरंट यांना ग्रामीण टच देण्याचा ट्रेंड आहे. अनेक मोठ्या हॉटेलमध्ये शेतकरी,  बैलगाडी, नांगर अशा वस्तूंची सजावट दिसून येते. तुम्ही हीच थीम बापासाठी सुद्धा वापरू शकता. यासाठी तुम्ही आजपासूनच काही बॉक्समध्ये माती भरून त्यामध्ये भाताचे किंवा मोहरीचे पीक लावू शकता. आणि बाप्पा विराजमान करणार असाल तिथे ही शेत उभे करू शकता.

याला अजून ग्रामीण टच देण्यासाठी तुम्ही बैलगाडी, जुन्या पद्धतीची घरे, छोट्या ग्रामीण लोकांच्या मूर्ती, छोटे प्राणी यांच्या मूर्ती ठेऊ शकता.

विटांमधील सजावट

तुम्हाला बाप्पासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही विटांची मदत घेऊ शकता. आता विटांपासून घर बनवणे तर शक्य नाही. पण विटांचा वापर करून एक सुंदर सजावट नक्कीच होऊ शकते.

तुम्ही बापाला विराजमान करण्यासाठी एखादा टेबल घेता. त्यावर फक्त थोड्या थोड्या अंतरावरती विटा ठेवून त्यावर एकावर एक विटा रचून घ्या. या विटांच्या मध्ये तुम्ही आर्टिफिशल लाइट्स वापरू शकता. हे एक वेगळे डेकोरेशन वाटेल.

 

झुल्यातील गणेशा

तुमच्या घरी जर मोठा झुला असेल तर त्यावर विराजमान झालेला बाप्पा खूप सुरेख दिसेल. फक्त तुम्हाला योग्य ती सुरक्षेतेची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही एखाद्या पाटावर बाप्पाला बसवून दोन्ही बाजूंनी दोर बांधून त्याला फुलांनी सजवू शकता ज्यामुळे आपला बाप्पा झुल्यात बसला आहे असे दिसेल. 

तुमच्याकडे गौरी असतील तर गौराई बाप्पाला झोका देती आहे अशी ही सजावट याने होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.